भारतीय क्रिकेट संघ गुरुवारपासून (२४ फेब्रुवारी) श्रीलंकेविरुद्ध टी२० मालिकेला सुरुवात करणार आहे. मालिका सुरू होण्यास दोन दिवसांपेक्षा कमी अवधी शिल्लक असताना भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघाचा प्रमुख फलंदाज व वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत मालिकावीर ठरलेला सूर्यकुमार यादव हा मालिकेतून बाहेर पडला आहे. पहिल्या सराव सत्रा दरम्यान त्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे
पहिल्या सराव सत्रात झाली दुखापत
सूर्यकुमार यादव हा मंगळवारी पहाटे भारतीय संघासह लखनऊ येथे पोहोचला होता. त्यानंतर त्याने संघाच्या पहिल्या सराव सतत सहभाग नोंदवला. मात्र, याच सरावावेळी त्याच्या बोटांवर चेंडू आदळल्यानंतर त्याचे बोटे फ्रॅक्चर झाले आहे. याच कारणास्तव तो संपूर्ण मालिकेत खेळू शकणार नाही. सुर्यकुमार नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत मालिकावीर ठरला होता. मालिकेतील पहिल्या व तिसऱ्या सामन्यांमध्ये नाबाद खेळी करत त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.
दीपक चहरही अनुपस्थितीत
सूर्यकुमारच्या आधी मालिकेसाठी निवड झालेला संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहर हा देखील या टी२० मालिकेतून बाहेर पडला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. सर्व वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर त्याच्या उजव्या पायाच्या हॅमस्ट्रिंग ताणले गेल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तो ४ ते ६ आठवडे क्रिकेट खेळू शकणार नाही. बीसीसीआयने सूर्यकुमार व दीपक यांच्या जागी अद्याप कोणत्याही बदली खेळाडूची घोषणा केली नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्र्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, आवेश खान.
टी२० मालिकेचे वेळापत्रक-
पहिला टी२० सामना- २४ फेब्रुवारी- लखनऊ
दुसरा टी२० सामना- २६ फेब्रुवारी- धर्मशाला
तिसरा टी२० सामना- २७ फेब्रुवारी- धर्मशाला
महत्वाच्या बातम्या-
कोच द्रविडने केली ईशान किशनची पाठराखण; सांगितले वारंवार संधी देण्याचे कारण (mahasports.in)