ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. या संघात बऱ्याच युवा खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे. मात्र असे काही खेळाडू आहेत, जे चांगला खेळ करत असूनही त्यांचा अद्यापही विचार केला जात नाही. त्यामुळे निवड समितीवर टीका होत आहेत. सूर्यकुमार यादवला या दौऱ्यासाठी भारतीय संघात घ्यायला हवे होते, असा मनातून सतत एक आवाज येत असल्याचे भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने म्हटले आहे.
तो म्हणाला की, “मनातून सातत्याने एकच आवाज येतो की, सूर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघात निवड व्हायला पाहिजे होती.” आयपीएल हंगाम संपताच भारताचा संघ ‘युएई’मधूनच 12 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निघणार आहे. 27 नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यावर भारताचा संघ 3 वनडे सामने, 3 टी-20 सामने तसेच 4 कसोटी सामने खेळणार आहे. साधारण 2 महिने आणि 1 आठवडा हा दौरा चालणार आहे.
सूर्यकुमार यादवने मुंबईच्या संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर यशस्वी खेळी केली आहे. मुंबईच्या संघात आल्यापासून त्याचा खेळ हा खूप सुंदर होऊ लागला असून मुंबईसाठी तो एक महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. 2018 साली त्याने 512 धावा, 2019 साली 424 तर 2020 च्या यंदाच्या हंगामात त्याने आतापर्यंत 461 धावा केल्या आहेत. सोबतच अंतिम सामन्यात त्याच्याकडून चांगला खेळ मुंबईला अपेक्षित आहे.
आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडिओमध्ये पुढे म्हटले की, इशान किशननेही या हंगामात उत्तम खेळ केला आहे संजू सॅमसन, रिषभ पंतऐवजी त्याचे नाव यादीत असायला पाहिजे होते. किशन बरोबरच चोप्राने हार्दिक पंड्याच्या खेळीचेही कौतुक केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘संघनिवड’ ही बेंगलोरची मुख्य समस्या, माजी दिग्गजाने प्रश्न केले उपस्थित
जेव्हा विराट कोहली स्वतः लाच म्हणाला होता ‘उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज’, पाहा व्हिडिओ
‘ते’ चार खेळाडू म्हणजे SRHचे ‘चार मिनार’, माजी दिग्गजाने सांगितली नावे
ट्रेंडिंग लेख-
बेंगलोरचे तेराव्यांदा स्वप्नभंग होण्यास कारणीभूत ठरले हैदराबादचे ‘हे’ ५ शिलेदार
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ
आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा