---Advertisement---

‘टी20 स्पेशालिस्ट’ सूर्याची वर्ल्डकपसाठी खास तयारी! स्वत:च सांगितले, कशी आहे स्पेशल ट्रेनिंग?

On: शनिवार, सप्टेंबर 17, 2022 3:01 PM
Suryakumar Yadav
---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup 2022) महासंग्राम सुरू होणार आहे. या आठव्या विश्वचषकाआधी भारतीय संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही टी20 मालिका खेळणार आहे. या तिन्ही मालिकांमध्ये भारताचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याची संघात वर्णी लागली आहे. यामुळे सध्या तो विशेष सरावामध्ये व्यस्त आहे.

टी20 विश्वचषकात भारताचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) हा करणार आहे. तर फलंदाजीच्या ताफ्यात रोहित, केएल राहुल आणि विराट कोहली (Virat Kohli) यांचा समावेश आहे. मधल्या फळीमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) असल्याने त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. यासाठी तो कसून सराव करत आहे. या वर्षीची महत्वाची स्पर्धा खेळण्यासाठी तो उत्सुक आहे.

सूर्यकुमार त्याच्या या विशेष फलंदाजी सरावाबाबत टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाला, “मी कारकिर्दीत पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. विशेषकरून इंग्लंड मालिका सुरू झाली होती तेव्हाच मी कर्णधार रोहितसोबत चर्चा केली आहे. यावेळी आम्ही खेळपट्टी आणि गोलंदाजीबाबत चर्चा केली होती. मला वेगवान खेळपट्टीवर खेळायला आवडते. मला वाटते की, वेगवान खेळपट्टीवर उसळी घेणाऱ्या चेंडूवर माझा खेळ चांगला होतो.”

सूर्याची खास तयारी
विश्वचषकासाठी सूर्यकुमार विशेष तयारी करत आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला, “मैदानाच्या आकारावरून आव्हान किती मोठे हे समजणार आहे. तेथे आम्हाला स्मार्ट खेळ करावा लागेल. त्यानुसार मी सराव करत आहे. त्या खेळपट्ट्यावर कसा खेळ करायचा यासाठी विकेटसमोर सर्वाधिक शॉट खेळण्याचा प्रयत्न करत आहे. याचा उपयोग विश्वचषकामध्ये होईल याची अपेक्षा आहे.”

https://www.instagram.com/p/CiCxpIkrlbF/?utm_source=ig_web_copy_link

सूर्याचे आंतरराष्ट्रीय टी20तील शतक
32 वर्षीय सूर्यकुमारने 2021मध्ये भारताच्या टी20 संघात पदार्पण केले. त्याला पदार्पणाच्या सामन्यात इंग्लंड विरुद्ध फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही, मात्र त्याने दुसऱ्याच सामन्यात 57 धावा केल्या होत्या. त्याने आतापर्यंत 28 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 36.86च्या सरासरीने 811 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. हे शतक (117 धावा) त्याने इंग्लंडमध्ये इंग्लंड विरूद्ध केले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शेन बाँड हेड कोच, तर एमआय एमिरेट्सच्या कोचिंग स्टाफमध्ये ‘या’ दिग्गजांचा समावेश
भारताचा कर्णधार बनल्यानंतर संजूने दिली पहिली प्रतिक्रिया, राहुल-पंतबद्दलही लक्षवेधी भाष्य
रोहित शर्माच नाही तर ‘हा’ खेळाडूही खेळणार आठवा टी20 विश्वचषक, कॅप्टन आहे संघाचा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---