टी20 विश्वचषक स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. भारतीय संघाने पर्थ येथे पोहोचताच दुसऱ्या दिवशीच सराव सत्र आयोजित केले. भारतीय संघ 10 आणि 13 ऑक्टोबर रोजी दोन सराव सामने खेळणार असून, त्यानंतर ते ब्रिस्बेनला रवाना होतील. ब्रिस्बेन येथे भारतीय संघ ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी आयोजित सराव सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर भारतीय संघाच्या झालेल्या पहिल्या सराव सत्रानंतर संघाचा प्रमुख फलंदाज सूर्यकुमार यादव याने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
बीसीसीआयच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार बोलताना दिसतोय. तो म्हणाला, “पहिल्या सराव सत्रात सहभागी होण्यासाठी आणि येथील वातावरण कसे आहे हे अनुभवण्यासाठी मी उत्सुक होतो. ऑस्ट्रेलियातील पहिले सराव सत्र आश्चर्यकारक होते. खेळपट्टीचा वेग कसा आहे? बाउन्स कसा आहे हे बघायचं होते.”
तो पुढे बोलताना म्हणाला,
“तुम्हाला नवीन ठिकाणी परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल तरच तुम्ही योग्य ठिकाणी पोहोचता. विश्वचषकासाठी मी खूप उत्साही आहे. परंतु तुम्हाला तुमच्या प्रक्रियेशी आणि दिनचर्येशी प्रामाणिक राहावे लागेल. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.”
सूर्यकुमार सध्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानी विराजमान आहे. भारतीय संघाला त्याच्याकडून विश्वचषकात आणखी चांगल्या खेळाची अपेक्षा आहे.
https://twitter.com/BCCI/status/1578950882934214656?t=9J3IwMj5iEkh7OQqOU3SMw&s=19
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अजून तर खूप खेळणार आहे…’, टी-20 विश्वचषकातून वगळल्यानंतर शार्दुल ठाकुर नाराज
बाबरकडून टीकाकारांची बोलती बंद, न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक ठोकत विराट-रोहितच्या विक्रमाशी केली बरोबरी
सिराजच्या वेगापुढे डी कॉकने टेकले गुडघे, पापणी लवण्याच्या आतच उडवल्या दांड्या; व्हिडिओ पाहाच






