भारतीय संघाचा युवा फलंदाज सूर्यकुमार यादव टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत आपल्या बॅटमधून आग ओकत आहे. त्याने या स्पर्धेत खेळलेल्या 5 सामन्यांपैकी 3 सामन्यात अर्धशतक झळकावलं आहे. कर्णधार रोहित शर्मा हादेखील त्याच्यावर भलताच खुश आहे. एवढा विस्फोटक फलंदाज असलेला सूर्यकुमार जर क्रिकेटर नसता, तर काय असता? असा प्रश्न त्याला एकदा विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने काय उत्तर दिले होते, चला जाणून घेऊया…
आयपीएल 2021 स्थगित झाल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) घरीच आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत होता. यादरम्यान, तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय होता. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवरून चाहत्यांशी संवादही साधलेला. यादरम्यान तो चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसला. तसेच त्याने आपल्या आवडी-नावडींविषयी अनेक मजेदार खुलासे केले.
आवडत्या खेळाडूंविषयी मांडली मते
मुंबईकर सूर्यकुमार यादवने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून चाहत्यांशी बराचवेळ संवाद साधला. यादरम्यान चाहत्यांनी त्याला त्याच्या आवडत्या क्रिकेटपटूंना एका शब्दात काय म्हणाल, याबाबत विचारले. त्यावर सूर्यकुमारने विराट कोहलीला ‘प्रेरणास्त्रोत’, माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीला ‘दिग्गज’, त्याचा आयपीएलमधील कर्णधार रोहित शर्माला ‘हिटमॅन’ व सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकरला ‘देव’ असे संबोधले.
सूर्यकुमारने झाडूचे चित्र दाखवत स्विप शॉट त्याचा आवडता असल्याचे सांगितले. त्यासोबत आत्तापर्यंत त्याची सर्वोत्तम खेळी ही इंग्लंडविरुद्ध ठोकलेले अर्धशतक होते, असे त्याने म्हटले. आपला आयपीएलमधील संघ मुंबई इंडियन्सबाबत बोलताना तो म्हणाला, हा आमचा केवळ संघ नसून एक परिवार आहे.
आवडी-निवडी विषयी केले खुलासे
सूर्यकुमारने क्रिकेटव्यतिरिक्त आपल्याला कोणत्या गोष्टींमध्ये रस आहे, याबाबत देखील अनेक खुलासे केले. एका चाहत्याने त्याला विचारले, क्रिकेटपटू नसता तर तू काय असता? यावर त्याने ‘अभिनेता’ असे उत्तर दिले. यासोबत त्याने आपला आवडता अभिनेता म्हणून रणबीर कपूरचे नाव घेतले.
आपला आवडता पदार्थ बिर्याणी असल्याचे त्याने सांगितले. यासोबतच सूर्यकुमारने एक व्हिडीओ शेअर करत ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटातील एक संवाद देखील चाहत्यांना ऐकवला.
इंग्लंडविरुद्ध केले भारताकडून पदार्पण
देशांतर्गत क्रिकेटमध्ये तसेच आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी करुन अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली. मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध त्याने टी२० सामन्यातून पदार्पण केले होते. दुसऱ्या सामन्यात त्याने तुफानी अर्धशतक झळकावत चाहत्यांची मने जिंकली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘सूर्य’ पुन्हा तळपला, वादळी अर्धशतकासह मोठा विक्रम नावावर; ठरलाय एकटाच भारतीय
‘पोराला हात लावाल तर…’, मैदानावर आलेल्या चिमुकल्या चाहत्याला पोलिसांनी घेरताच हिटमॅन खवळला, Video व्हायरल