सूर्यकुमार यादव हा मागील दोन वर्षापासून भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वाचा सदस्य बनला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो सातत्याने धावा करताना दिसतो. तसेच तो आगामी काळात कसोटी संघात देखील पदार्पण करण्याची शक्यता आहे. भारतीय संघाच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक बनलेल्या सूर्यकुमार याच्याकडून भारताला पुढील वर्षी होत असलेल्या वनडे विश्वचषकातही मोठी अपेक्षा असेल. विश्वचषकासाठी सूर्यकुमार आपल्या फलंदाजी पद्धतीत बदल करणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर त्याने आपले उत्तर दिले.
सूर्यकुमार सध्या फलंदाजांच्या टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानी विराजमान आहे. टी20 क्रिकेटमध्ये त्याच्या कामगिरीच्या जवळपासही कोणी नाही. तो मैदानाच्या चारही कोपऱ्यात विविध फटक्यांद्वारे धावा करताना दिसतो. त्यामुळे आगामी वनडे विश्वचषकात फलंदाजीमध्ये काही बदल करणार का? असा प्रश्न त्याला नुकताच एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला,
“मी क्रिकेटचा कोणताही प्रकार खेळत असलो तरी कधीही त्याचा विचार करत नाही. खेळपट्टीवर उतरल्यावर मी फक्त माझ्या फलंदाजीचा आनंद घेत असतो. मी फलंदाजीला आल्यानंतर सामन्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न करतो. मला फक्त फलंदाजी करायला आवडते. मग तो प्रकार रणजी क्रिकेट, वनडे व टी20 क्रिकेट कोणताही असो.”
याच मुलाखतीत त्याने विविध मुद्द्यांवर देखील आपली प्रतिक्रिया दिली. कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्याला संधी मिळण्याची आशा आहे. भारताच्या कसोटी संघात प्रवेश मिळवण्यासाठी त्याने रणजी ट्रॉफीमध्ये स्वत:ला पारखण्याचा निर्णय घेतला आहे. रणजी ट्रॉफी 2022-2023 मध्ये मुंबईसाठी खेळताना त्याने पहिल्या दोन सामन्यात चमकदार कामगिरी केली.
(Suryakumar Yadav Talk About His Batting Style In ODI Cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लाईव्ह कार्यक्रमात गेलचा अनिल कुंबळेंवर आयपीएल कारकीर्द संपवल्याचा आरोप; म्हणाला…
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतून रोहित-राहुलचा पत्ता कट? कारणही घ्या जाणून