मुंबई इंडियन्स संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव हा आपल्या मजेशीर स्वभावासाठी सोशल मीडियात मोठ्याप्रमाणात प्रसिद्ध आहे. आयपीएल 2021 स्पर्धा रद्द झाल्यामुळे सुर्यकुमार सध्या आपल्या घरीच असून या फावल्या वेळेत तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वेळ घालवत आहे. दरम्यान नुकतेच मुंबई इंडियन्सने सूर्यकुमारचा एक छोटासा व्हिडिओ सोशल मीडियात शेयर केला असून,यात त्याने आपल्या आवडत्या चित्रपटांबद्दल खुलासा केला आहे.
सूर्यकुमारने या व्हिडिओ मध्ये आपल्या आवडत्या चित्रपटांमध्ये अंदाज अपना अपना, चुपके चुपके आणि हेराफेरी या चित्रपटांची नावे घेतली आहेत. विशेष म्हणजे सूर्यकुमारने स्पष्ट केले की त्याला विनोदी चित्रपट बघायला आवडतात, कारण या चित्रपटांद्वारे तो क्रिकेट सामना खेळल्यानंतर आलेला आळस व थकवा दूर करू शकतो. या व्हिडिओ दरम्यान सूर्यकुमारने ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटातील आमिर खानच्या एका मजेशीर डायलॉगची नक्कल देखील केली आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमारने ही नक्कल इतकी हुबेहूब केली की, मुलाखत घेणारा अँकर देखील अचंबित झाला. सूर्यकुमारचा हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात वायरल होत असून, नेटकरी देखील त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.
From 'Andaz Apna Apna' to 'Hera Pheri' ????
????: 106 seconds of Surya talking about his favourite comedy movies from Bollywood ????#OneFamily #MumbaiIndians #KhelTakaTak @surya_14kumar @MXTakaTak MI TV pic.twitter.com/9se9f2ZtaW
— Mumbai Indians (@mipaltan) May 26, 2021
दरम्यान सूर्यकुमारच्या क्रिकेट कारकिर्दीचा विचार केला असता, सध्या तो शानदार फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2021 मध्ये त्याने 7 सामन्यात 144 च्या स्ट्राइक रेटने 173 धावा केलेल्या आहेत. आगामी काळात भारतीय संघ एकाच वेळी इंग्लंड व श्रीलंकेचा दौरा करणार आहे, त्यामुळे प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थिती सूर्यकुमारला श्रीलंका दौऱ्यात संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीच्या अनुपस्थितीत सूर्यकुमारला नंबर 3 वर देखील फलंदाजीची संधी मिळू शकते. निश्चितच सूर्यकुमारला स्वतःला सिद्ध करण्याची ही मोठी संधी असून, हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की तो श्रीलंका दौर्यात कशाप्रकारे कामगिरी करतो.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका दौऱ्यासाठी हर्षा भोगलेंनी निवडली भारताची प्लेइंग इलेव्हन, पाहा कोणाला दिली संधी
वाढदिवशी पण शास्त्री गुरूजी ट्विटरवर ट्रोल, पाहा काही भन्नाट मिम्स
५ कमनशिबी कर्णधार, ज्यांना केवळ एकाच टी२० सामन्यात मिळाली नेतृत्वाची संधी






