मुंबई इंडियन्स व भारतीय संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादव आयपीएल 2021 रद्द झाल्यामुळे सध्या क्रिकेटपासून दूर आहे. आयपीएल 2021 च्या निलंबनापासून सूर्यकुमार घरीच असल्यामुळे, अलीकडील काळात तो सोशल मीडियावर खूपच सक्रिय झाला आहे. नुकतीच त्याने विराट कोहली आणि एमएस धोनीबद्दल सोशल मीडियावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. तसेच त्याने श्रेयस अय्यरच्या एका पोस्टवर देखील मजेशीर प्रतिक्रिया दिली होती. आता मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया हँडलवर सूर्यकुमार यादवचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून या व्हिडिओमध्येही तो आपला भारतीय संघातील सहकारी युजवेंद्र चहलवर मजेदार कमेंट्स करत आहे.
सूर्यकुमार मुंबई इंडियन्सच्या अँकरशी चर्चा करत असताना चहलचा उल्लेख होता. त्यानंतर अँकरने सूर्यकुमारला विचारतो की, ‘चहल त्याच्या बॅटबद्दल विचारत राहतो, तर तू त्याची बॅट घेतली आहे का?’ सूर्यकुमारने उत्तर दिले की त्याने कोणतीही बॅट घेतली नाही, त्याऐवजी चहलच त्याच्याकडून बॅट मागतो आहे. सूर्यकुमार म्हणाला की, त्याची बॅट ही फार जड आहे आणि चहल कदाचित ती उचलू शकणार नाही. संभाषणादरम्यान सूर्यकुमार पुढे म्हणाला, “तो (चहल) मला बॅट देण्यास सांगत आहे पण माझी बॅट थोडी जड आहे. मी किती तरी वेळा त्याला सांगितले आहे की तू खूप बारीक आहेस, तू माझी बॅट कशी वापरणार. पण हो, मला सांगायचे आहे की, पुढच्या वेळी जेव्हा मी त्याला भेटेन तेव्हा मी त्याला एक बॅट नक्की देईन.”
https://twitter.com/mipaltan/status/1397128891370676224?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1397128891370676224%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9hindi.com%2Fsports%2Fcricket-news%2Fsuryakumar-yadav-mocks-yuzvendra-chahal-on-demanding-his-bat-670547.html
दरम्यान सूर्यकुमार हा आयपीएल 2021 मध्ये शानदार फॉर्म मध्ये होता. आगामी काळात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यात प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्याला भारतीय संघात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे त्याकाळात नियमित कर्णधार विराट कोहली इंग्लंड दौऱ्यात व्यस्त असल्यामुळे विराटच्या अनुपस्थित सूर्यकुमार हा भारतीय संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. निश्चितच सूर्यकुमारसाठी ही एक मोठी संधी असून त्याच्या समर्थकांना आशा असेल की तो उत्तम कामगिरी करत भारतीय संघात आपले स्थान आणखीनच पक्के करेल.
महत्त्वाच्या बातम्या –
तयारी कसोटी चॅम्पियनशीप पटकावण्याची! पाहा खेळाडू क्वारंटाईनमध्ये कशी घेतायेत तंदुरुस्तीची काळजी
बालपणीच्या शाळेतील शिक्षकाला लैंगिक अत्याचाराच्या प्रकारांत अटक होताच अश्विनने केले ‘असे’ ट्विट