भारतीय संघाचा 360 डिग्री फलंदाज म्हणून ओळखला जाणार सूर्यकुमार यादव सध्या इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेच्या तयारीत व्यस्त आहे. या महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी सूर्यकुमार यादवनं आपल्या पत्नीसह शिर्डी येथील साईबाबांचं दर्शन घेतलं. गेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत त्याची कामगिरी चांगली राहिली होती. या मालिकेत सुद्धा त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत सूर्यानं तिलक वर्माला तिसऱ्या स्थानी फलंदाजी करण्याची संधी दिली होती. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्यानं शानदार कामगिरी केली होती. त्यानंतर सूर्यकुमार मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याची कामगिरी चांगली राहिली. त्यानं एका सामन्यात 46 चेंडूत 70 धावांची अर्धशतकी खेळी करत मुंबईला विजय मिळवून दिला होता. मात्र त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीत सूर्याची बॅट चालली नाही.
भारतीय टी20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला वनडे टीममध्ये स्थान मिळेल असं वाटत नाही. सूर्यकुमार यादवनं 2023 विश्वचषकात भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची आकडेवारी निराशाजनक राहिली आहे. हे लक्षात घेता भारतीय टीम मॅनेजमेंट त्याच्या बाबतीत रिस्क घेण्याच्या मुडमध्ये नाही.
सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत जरी चांगली कामगिरी केली, तरी त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या संघात स्थान मिळेलच याची आशा फारच कमी आहे, त्याच्या जागी तिलक वर्माची चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये राखीव फलंदाज म्हणून निवड होऊ शकते. या फॉरमॅटमध्ये तिलक वर्माची अलिकडची कामगिरी चांगली राहिली आहे.
हेही वाचा –
कांगारुंना मोठा धक्का! आगामी चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये कर्णधाराचा सहभाग अनिश्चित, भारताला दिलासा!!
‘रोहितसह जयस्वाल…’, क्रिकेट पंडित आकाश चोप्राने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला संघ निवडला
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक हॅट्रिक घेणारे टॉप 3 संघ, यादीत भारताचा समावेश?