सध्या भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडीजमध्ये आहे. नुकतीच उभय संघातील वनडे मालिका समाप्त झाली. यात भारतीय संघाने निर्भळ यश मिळवले. याच दरम्यान काही भारतीय खेळाडूंचा एक इंस्टाग्राम लाईव्हचा व्हिडिओ चांगला चर्चेत आला होता. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, चहल, रिषभ पंत आणि एमएस धोनीदेखील दिसत होते. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया खात्यांवरून आणखी एक नवा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये रोहित, सूर्यकुमार व पंत चक्क एका मराठी चाहत्याशी संवाद साधताना दिसत आहेत.
मुंबई इंडियन्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार आपल्या इन्स्टा लाईव्हमध्ये एका मराठी मुलाला सहभागी करून घेतो. ज्यामध्ये आधीच रोहित व रिषभ पंत उपस्थित असतात. तो मराठी मुलगा ऍड झाल्यानंतर ‘आईशप्पथ’ अशी प्रतिक्रिया देतो. दुसरीकडे सूर्यादेखील तसेच बोलताना दिसत आहे. त्यावर रोहित शर्मा, “अरे मराठी माणूस आलाय” असे बोलतो.
https://fb.watch/ey93egj0LT/
काहीसा अंधारात असलेला तो चाहता धावत घरात जातो व इतरांना आपण रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांच्याशी बोलत असल्याचे सांगतो. मात्र, ते त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. तेव्हा सूर्यकुमार यादव त्याला “तू बरोबर दाखव ना?” असा सल्ला देतो. त्यानंतर तो चाहता सूर्यकुमार यादव याला “मी तुला ओळखतो, तू बीएआरसीमध्ये राहतो ना? आम्ही वाशीमध्ये राहतो.” असे सांगतो तेव्हा सूर्यकुमार “हो जास्त लांब नाही.” असे उत्तर देतो. तो चाहता, “तू वाघमारे काकांना ओळखत असशील” असे विचारल्यावर सूर्यकुमार होकारार्थी मान डोलवताना दिसला.
रिषभ पंतने “ये क्रिकेट खेलता है क्या?” असे विचारल्यानंतर चाहता त्याला आपल्या घरातील ट्रॉफीज दाखवू लागतो. ट्रॉफीच्या बाजूला असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दाखवताना हा चाहता, “छत्रपती शिवाजी महाराजांचा…” अशी साद घालतो. त्यावर रोहित शर्मा उत्स्फूर्तपणे ‘विजय असो’ व पंत ‘जय हिंद’ अशी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, त्याचे व्ह्यूज कोट्यावधींच्या घरात पोहोचले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार ‘गब्बर’ ठरतोय माहीपेक्षाही वरचढं?, केलीये ‘या मोठ्या विक्रमाची बरोबरी