---Advertisement---

कुलदीप यादवच्या घातक गोलंदाजीबाबत सूर्यकुमारचं धक्कादायक विधान; म्हणाला, ‘त्याने कितीही विकेट घेतल्या तरी…’

Kuldeep Yadav And Suryakumar Yadav
---Advertisement---

जोहान्सबर्गमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात कुलदीप यादव याने भारतीय संघासाठी चांगली गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे कुलदीपने त्याच्या वाढदिवसानिमित्त ही संस्मरणीय कामगिरी केली आणि संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने यावर मोठी प्रतिक्रिया दिली. असा परफॉर्म करून कुलदीपने वाढदिवसाच्या निमित्ताने स्वत:ला भेट दिल्याचे त्याने म्हटले.

कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याने त्याच्या वाढदिवशी जबरदस्त कामगिरी केली. त्याने फक्त 2.5 षटके टाकली आणि 17 धावांत 5 विकेट्स घेतल्या, ही त्याची टी20 मधील सर्वोत्तम कामगिरी आहे. चायनामन गोलंदाजाने त्याच्या पहिल्या दोन षटकात दोन विकेट्स घेतल्या होत्या परंतु तिसऱ्या षटकात त्याने तीन विकेट घेतल्या, ज्यामध्ये डेव्हिड मिलर (David Miller) याची सर्वात मोठी विकेट्स होती.

सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने कुलदीप यादवबद्दल मोठे वक्तव्य केले. तो म्हणाला, “कुलदीप यादवने कितीही विकेट घेतल्या तरी तो आनंदी नसतो. त्याला नेहमीच चांगली कामगिरी करायची असते. त्याच्या वाढदिवशी त्याने स्वतःला एक छान भेट दिली आहे. तुम्हाला तुमचा खेळ समजून घेणे खूप महत्वाचे आहे.”

भारतीय संघाने जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 106 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 विकेट्स गमावून 201 धावा केल्या. यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याने 41 चेंडूत 61 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने 56 चेंडूत 100 धावांची शानदार खेळी केली. प्रत्युत्तरात आफ्रिका संघ 13.5 षटकांत केवळ 95 धावांवरच सर्वबाद झाला. कुलदीप यादवने जबरदस्त गोलंदाजी करत अवघ्या 17 धावांत 5 विकेट्स घेतल्या. यासह मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. (Suryakumar’s Shocking Statement Regarding Kuldeep Yadav’s Dangerous Bowling Said No matter how many wickets he takes)

हेही वाचा

अर्रर्र! आगामी टी20 लीगमध्ये कुठल्याच संघाने विश्वास न दाखवल्याने पाकिस्तानी खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती
INDvsSA: वर्ल्डकपमधील फिल्डिंग मेडलचे कमबॅक, पण यावेळी दिसला नवा अंदाज; कोण बनला मानकरी? पाहा Video

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---