‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ फेम दिवंगत सुशांत सिंग राजपूतची आज प्रथम पुण्यस्मरण आहे. गेल्यावर्षी १४ जून रोजी त्याचे निधन झाले होते. आज त्याच्या अनेक आठवणींवर आणि त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या टप्प्यांवर नजर टाकली जात आहे. आज या लेखातून सुशांतने ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीवर नजर टाकू.
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आपल्या कारकिर्दीत पीके, शुद्ध देशी रोमान्स, एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी आणि छिछोरे असे शानदार चित्रपट केले. सुशांतने खूप कमी काळात अभिनय क्षेत्रात आपला प्रभाव निर्माण केला होता. धोनीच्या बायोपिकसाठी त्याने खूप मेहनत केली होती. यासाठी त्याने स्वत:ला फक्त फिट ठेवले नव्हते, तर त्याने एका क्रिकेटपटूसारखी ट्रेनिंगही घेतली होती. तो तासंतास मैदानावर धोनीसारखी फलंदाजी करण्याचा सराव करत होता.
यष्टीरक्षणामध्ये हातखंडा असलेल्या धोनीची यष्टीरक्षण शैली शिकण्यासाठी सुशांतला एका क्रिकेटपटूप्रमाणे खूप ट्रेनिंग देण्यात आली होती. याची जबाबदारी भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी स्विकारली होती. ते सुशांतला धोनीच्या यष्टीरक्षणाचे व्हिडिओ दाखवत होते.
या सिनेमाच्या संबंधित एका जुन्या वृत्तामध्ये देण्यात आले होते की, ‘सुशांत रोज ऊन्हात किरण मोरे यांच्यासोबत ३-४ तास यष्टीरक्षणाचा सराव करत असायचा. दरम्यान किरण मोरे हे हातात मोठी काठी घेऊन येत असायचे. त्यांची ट्रेनिंग इतकी कठीण होती की, एका अभिनेत्याला त्याचा सामना करणे खूप अवघड होते. सरावादरम्यान सुशांतच्या हाताची २ बोटे तुटली होती. या गोष्टीवरुन याचा अंदाजा लागू शकतो की किरण मोरे यांनी सुशांतकडून कशाप्रकारे सराव करुन घेतला असावा.’
परंतु, सुशांतच्या अथक परिश्रमांमुळे आणि किरण मोरे यांच्या कडक सरावामुळे सुशांत धोनीची भूमिका जिवंत करण्यात यशस्वी ठरला होता. जॉन अब्राहमपासून ते अक्षय कुमारपर्यंत मोठ-मोठ्या अभिनेत्यांनी धोनीच्या भूमिकेसाठी प्रयत्न केले होते. परंतु, मोठ्या पडद्यावर धोनी बनण्याची संधी फक्त सुशांतला मिळाली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तिसऱ्या कसोटी सामन्यांत भारतीय संघात होणार ‘हे’ मोठे बदल, जाणून घ्या कशी असेल संघाची ‘प्लेइंग ११’
‘सचिन नंतर फक्त ‘या’ खेळाडूचा खेळ बघण्यास उत्सुक आहे’, सुनिल गावस्करांनी जाहिर केली इच्छा