आपल्या अभिनयाने घराघरात पोहचलेला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने काल त्याची जीवनयात्रा संपवली. वांद्र्यातील त्याच्या राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त काल दुपारी समोर आहे. या वृत्तानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुशांतने त्याच्या कारकिर्दीत काही मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यातील त्याची मुख्य भूमिका असलेला ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट चांगला गाजला होता. या चित्रपटानंतर त्याच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली.
या चित्रपटात त्याच्याबरोबर जमशेदपूरचे ज्येष्ठ रंगकर्मी शिवलाल सागर यांनीही एक छोटी भूमिका केली होती. त्यांनी क्रीडा साहित्याचे दुकान चालवणाऱ्या व्यक्तीची भूमिका निभावली होती. त्या दुकानात धोनी त्याची बॅट घ्यायला जायचा.
त्या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सुशांत बरोबर आलेले अनुभव शिवलाल यांनी सांगितले आहेत. दैनिक जागरणने दिलेल्या वृत्तानुसार शिवलाल म्हणाले, ‘धोनीची भूमिका करणारा सुशांत चित्रीकरणावेळी विचारायचा की सर चहा पिणार का. तो इतका मोठा कलाकार होता की जरी त्याने मला तू म्हटले असते तरी मला वाईट वाटले नसते. पण यातून त्याचे संस्कार दिसत होते.
‘तो इतक्या सरळ स्वभावाचा होता की त्याच्या जवळ उभे राहुन कोणीही सेल्फी घेऊ शकत होता. कोणालाही तो नकार देत नव्हता. या दुकानाचे शूटिंग रांचीमधील वेगवेगळ्या ठिकाणी केले गेले. त्याने धोनीच्या देहबोलीची केवळ एक उत्तम कॉपी केली नाही, तर रांची-जमशेदपूरची बोल भाषेची झलकही त्याच्याकडे होती. संभाषणादरम्यान मी नाही तर तो आपण म्हणायचा. म्हणायचा की मला चहा प्यावासा वाटते आहे, मागवायचा का. जेव्हा मी म्हणायचो की हो प्या, तेव्हा तो स्पॉट बॉयला सांगून 2 चहा मागवायचा.’
शिवलाल यांनी पुढे सांगितले ‘दुपारी टीव्हीवरून वृत्त कळाले. तो आत्महत्या करू शकतो, यावर माझा विश्वास नाही. तो खूप कष्टकरी आणि हुशार होता. अन्यथा, ग्रुप डान्सपासून कारकिर्दिची सुरुवात करणे आणि सीरियलच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये इतका मोठा स्टार बनणे काही लहान गोष्ट नाही.
2016 ला सुशांत जमशेदपुरच्या कीनन स्टेडियमवर धोनीच्या चित्रपटासाठी उपस्थित होता. टाटा स्टीलचे अधिकारी आशिष कुमार यांनी त्यांचे स्वागत केले होते. गर्दी जमू नये म्हणून स्टेडियम चार दिवसांसाठी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ट्रेंडिंग घडामोडी –
सुशांतची ‘ती’ कृती पाहून धोनीही झाला होता अवाक्, म्हणाला…
३० हजार धावा केलेला खेळाडूही झाला होता सुशांतच्या फलंदाजीचा दिवाना
सुशांतच्या जाण्याने इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूलाही बसला जबर धक्का