भारताचा दोनवेळचा आॅलिम्पिकपदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला 4जुलैला जॉर्जियामध्ये झालेल्या त्बिलिसी ग्रांप्री स्पर्धेत अँड्रज पिओर सोक्लस्की विरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हा त्याचा चार वर्षातील पहिलाच पराभव आहे.
सुशीलला 74 किलोवजनी गटात अँड्रज पिओर सोक्लस्कीने 4-8 असे पराभूत केले आहे. याआधी सुशील मे 2014 ला इटलीमध्ये फ्रान्सच्या लुका लॅम्पिसविरुद्ध पराभूत झाला होता.
सुशील आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्ये सहभागी होणार आहे. त्यादृष्टीने आजची लढत महत्त्वाची होती.
मागील महिन्यात रेसलिंग फेडरेशन आॅफ इंडियाने एशियन गेम्ससाठी घेतलेल्या ट्रायल्समधून त्याला सुट दिली होती. ही सुट त्याला त्याच्या मागच्या चांगल्या कामगिरीच्या आणि गोल्ड गोस्ट येथे यावर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिळवलेल्या सुवर्णपदकामुळे देण्यात आली होती.
त्बिलिसी ग्रांप्री स्पर्धेत सुशीलला जरी पराभव पत्करावा लागला असला तरी भारताच्या बजरंग पुनियाने 65 किलो वजनीगटात आणि दीपक पुनियाने 86 किलो वजनी गटातील उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
-टीम इंडियाकडून पदार्पण करणाऱ्या खेळाडूला संघात येताच ही गोष्ट करावी लागते
-ही आहे विराटच्या आयुष्यातील सर्वात रोमांचकारी भावना
-रेकाॅर्ड अलर्ट: विंडीज-बांगलादेश सामन्यात झालेले हे ५ विक्रम सहसा क्रिकेटमध्ये पहायला मिळत नाहीत