राजस्थानची सुशीला मीना सध्या तिच्या गोलंदाजीमुळे खूपच चर्चेत आहे. 13 वर्षीय मीना हे डावखुरी वेगवान गोलंदाज आहे, जिची बॉलिंग ॲक्शन हुबेहुब दिग्गज गोलंदाज झहीर खानप्रमाणे आहे. गेल्या महिन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मीनाच्या गोलंदाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
सुशीला मीना आता राजस्थानचे क्रीडा मंत्री हर्षवर्धन सिंह राठोड यांच्या एका व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत आली आहे. वास्तविक, राज्यवर्धन सिंह राठोड यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये सुशीला मीना गोलंदाजी करताना तर राज्यवर्धन सिंह राठोड फलंदाजी करताना दिसत आहेत. यावेळी सुशीला एक खतरनाक चेंडू टाकते, ज्यावर क्रीडा मंत्री चक्क क्लीन बोल्ड होतात.
राज्यवर्धन सिंह राठोड यांनी स्वत:हा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “या मुलीच्या चेंडूवर क्लीन बोल्ड होऊन आपण सर्व जण जिंकलो.” येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, राजस्थान क्रिकेट असोसिएशनने सुशीलाला दत्तक घेतले आहे. तिच्या शिक्षणाचा आणि क्रिकेट ट्रेनिंगचा सर्व खर्च राजस्थान क्रिकेट असोसिएशन उचलणार आहे. तुम्ही सुशीलाचा व्हिडिओ येथे पाहू शकता.
बिटिया से क्लीन बोल्ड होकर हम सब जीत गए#राजस्थान #Rajasthan #Sports #Happiness #Cricket pic.twitter.com/VFrezO92GT
— Col Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) January 6, 2025
सचिन तेंडुलकर यांनी गेल्या महिन्यात 20 डिसेंबरला सुशीलाचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत तिची गोलंदाजी ॲक्शन झहीर खानप्रमाणेच आहे, असं म्हटलं होतं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये झहीर खानला देखील टॅग केलं होतं. सचिनची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली. यानंतर सुशीला मीनाच्या मदतीसाठी अनेकांनी पुढे येण्याची तयारी दर्शवली. तुम्ही सचिनने शेअर केलेला व्हिडिओ येथे पाहू शकता.
Smooth, effortless, and lovely to watch! Sushila Meena’s bowling action has shades of you, @ImZaheer.
Do you see it too? pic.twitter.com/yzfhntwXux— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 20, 2024
हेही वाचा –
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार? स्पर्धेचे ‘कट-ऑफ’ डेट समोर
‘त्याला माजी खेळाडूंशी…’, आऊट ऑफ फाॅर्ममध्ये असलेल्या ‘विराट’ला इरफान पठाणने सुनावले
वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, कर्णधारपदात मोठा बदल