---Advertisement---

स्वराज स्पोर्ट्स क्लब, जॉली स्पोर्ट्स क्लब पार्ले, स्वस्तिक संघाचा पुढील फेरीत प्रवेश.

On: बुधवार, जानेवारी 8, 2020 2:07 PM
---Advertisement---

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने क्रांती क्रीडा मोहस्तव कबड्डी स्पर्धेत चौथ्या दिवशी महिला गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लबने उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर द्वितीय श्रेणी मध्ये सक्षम स्पोर्ट्स क्लब व जॉली स्पोर्ट्स क्लब पार्ले संघाचा पुढील फेरीत प्रवेश केला.

महिला गटात झालेल्या सामन्यांत स्वराज्य स्पोर्ट्स क्लबने ४६-२४ असा एकतर्फी निर्विघन स्पोर्ट्स अकॅडमीचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. महिला गटात संघर्ष, महात्मा गांधी स्पोर्ट्स, महात्मा फुले स्पोर्ट्स, स्वराज्य क्लब संघानी उपांत्य फेरीत केला आहे.

पुरुष द्वितीय श्रेणी गटात सक्षम स्पोर्टस क्लब भांडुप संघाने २६-१४ असा छत्रपती मंडळ कांजुरमार्ग संघावर विजय मिळवला. तर जॉली स्पोर्ट्स क्लबने २४-११ असा ओम साई क्रीडा मंडळ घाटकोपर संघास नमवले.

पुरुष प्रथम श्रेणी गटात अमरज्योत क्रीडा मंडळाने ४०-२६ असा प्रशांत क्रीडा मंडळावर विजय मिळवला. मात्र स्वस्तिक क्रीडा मंडळाने दुसऱ्या फेरीत ३०-१२ असा अमरज्योत क्रीडा मंडळाचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---