दिल्ली येथील खाशाबा जाधव कुस्ती संकुलास सुरु असलेल्या स्पर्धेत 53 किलो फ्रीस्टाईल गटात कोल्हापूरच्या स्वाती शिंदेने रिपेचमध्ये पदकाची जादू घडविली.
थायलंडच्या बूनियासूवर 10-0 गुणांनी मात करीत स्वातीने कांस्य पदक जिंकले. पहिल्या फेरीपासूनच आक्रमक पवित्रा घेत स्वातीने एकेरी पटावर 2गुणांची कमाई केली.
पहिल्याच मिनिटाला भारद्वाज डावावर सलग 8 गुणांची खेळी करित स्पर्धेच्या तिसर्या दिवसाचे पहिले पदक देशाच्या नावापुढे झळकावले. सुवर्ण पदक अपेक्षेप्रमाणे जपानच्या युहोंग झोंगने जिंकले
यावेळी स्वातीला दत्तक घेतलेल्या डोर्फ केटल कंपनी सीएसआर प्रमुख संतोष जगधाने, दर्शन वाघ , संजय दुधाणे, प्रशिक्षक दादा लवाटे उपस्थित होते.
डोर्फ केटल टीमला पदक अर्पण
गेली 3 वर्षे मला उभारी देणार्या डोर्फ केटल कंपनी सीएसआर प्रमुख संतोष जगधाने, दर्शन वाघ , संजय दुधाणे, माझे प्राशिक्षक दादा लवाटे सरांना हे पदक मी अर्पित करीत आहे. आता जागतिक स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे