पुणे, 24 जानेवारी 2023: लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणी च्या वतीने स्वर्गीय ला.सागर डोमसे यांच्या स्मरणार्थ लायन्स व्हेट्रेन टी-20 क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत स्वयुश स्ट्रायकर्स, क्लासिक पँथर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.
मोशी येथील हजारे मैदान व थेरगाव येथील व्हेरॉक मैदानावर सूरू झालेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात सौरभ रावलिया (46धावा व 1-25) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर क्लासिक पँथर्स संघाने गार्गी एक्युकॉन संघाचा 9 धावांनी पराभव करून शानदार सुरुवात केली.
दुसऱ्या सामन्यात प्रशांत तेलंगी (नाबाद 57धावा व 2-21) याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्वयुश स्ट्रायकर्स संघाने रॉयल पासलकर संघाचा 40 धावांनी पराभव करून विजयी सुरुवात केली.
निकाल: साखळी फेरी:
क्लासिक पँथर्स: 20 षटकात 7बाद 156धावा(प्रशांत खराडे 69(45,8×4,1×6), सौरभ रावलिया 46(43,5×4), अरविंद चौहान 24, सचिन कापडे 2-21, महेश शिंदे 2-29) वि.वि.गार्गी एक्युकॉन: 20षटकात 8बाद 147धावा(राजेंद्र मदने 41(29,5×4), प्रीतम कैया 25, जॉन वाघमारे 18, भुषण देशपांडे 17, सतीश देवकर 16, भूपिंदरसिंग दुल्लत 2-18, सौरभ रावलिया 1-25); सामनावीर – सौरभ रावलिया; क्लासिक पँथर्स संघ 9 धावांनी विजयी;
स्वयुश स्ट्रायकर्स: 20षटकात 7बाद 145धावा(प्रशांत तेलंगी नाबाद 57(36,8×4), श्रीनिवास सरवदे 33(22,5×4), शिवदत्त पाटने 23, प्रशांत घेवारी 3-22, विजय कोतवाल 2-29) वि.वि.रॉयल पासलकर: 20षटकात 9बाद 105धावा(महेश दिवटे 38(27,6×4), विजय कोतवाल 17, दर्शन वणगे 15, किरण भोसले 3-18, प्रशांत तेलंगी 2-21); सामनावीर – प्रशांत तेलंगी; स्वयुश स्ट्रायकर्स संघ 40धावांनी विजयी. (Swayush Strikers, Classic Panthers celebrate victory in Lions Veteran T20 Cricket Tournament in memory of late L. Sagar Domse)
महत्वाच्या बातम्या –
क्रिकेटर ऑफ द इयर बनल्यानंतर गिल इमोशनल, विराटचं नाव घेत म्हणाला…
AUS vs WI । ऑस्ट्रेलिया संघावर कोरोना व्हायरसचा अटॅक! मुख्य प्रशिक्षकासह महत्वाच्या खेळाडूला लागण