प्रत्येक देशासाठी आपल्या खेळाडूने ऑलिंपिकमध्ये एखादे पदक जिंकले, तरी अभिमानाची गोष्ट असते. परंतु एक खेळाडू अशी आहे जिने एक स्पर्धेत ७ पदके जिंकले आहेत. जिथे प्रत्येक खेळाडू एक पदकसाठी तरसत आहेत. याच ऑलिंपिकमध्ये ऑस्ट्रेलियन जलतरणपटू एम्मा मॅककेउनने सलग ७ पदके जिंकून इतिहास रचला आहे.
रविवारी रिओ ऑलिंपिकमध्ये ४ पदके जिंकणारी ऑस्ट्रेलियन धावपटू एम्मा मॅककियोनने टोकियो ऑलिंपिकमध्ये ही सहभाग घेतला आहे. टोकियो एक्वाटिक्स सेंटरमध्ये महिलांच्या ४×१०० मीटर रिले स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सुवर्ण पदक जिंकण्यासाठी दोन वेळा गतविजेत्या अमेरिकेला हरवले आहे. काइली मॅकेन, चेल्सी हॉजेस, एम्मा मॅककियोन, केट कॅम्पबेल यांचा सहभाग असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने ३:५१:६० च्या नवीन ऑलिंपिक विक्रमी वेळेसह शर्यत जिंकली आहे. यासह अमेरिकेला दुसऱ्या स्थानावर टाकले आहे. तर कॅनडाने ३:५१:६० मध्ये कांस्य जिंकले आहे.
टोकियो २०२० च्या ऑलिंपिकमधील हे मॅककियोनचे सातवे पदक होते. ही कामगिरी इतर कोणत्याही महिला जलतरणपटूने एकाच खेळात साध्य केली नाही. २७ वर्षीय मॅककियोनने आता तीन कांस्य पदकासह टोकियो ऑलिंपिकमध्ये चार सुवर्ण जिंकले आहेत. सात पदके जिंकणारी ती ऑलिंपिकच्या इतिहासातील दुसरी महिला ठरली आहे. सोव्हिएत जिम्नॅस्ट मारिया गोरोखोव्स्काया यांनी १९५२ च्या हेलसिंकी गेम्समध्ये पदक जिंकल्यानंतर अशी कामगिरी करणारी ती एकमेव महिला ठरली.
Australia's most successful Olympian: Emma McKeon.
📄 Her CV
Rio 2016:
🥇4x100m Freestyle
🥈4x200m Freestyle
🥈4x100m Medley
🥉200m FreestyleTokyo 2020:
🥇4x100m Medley
🥇4x100m Freestyle
🥇100m Freestyle
🥇50m Freestyle
🥉4x200m Freestyle
🥉4x100m Butterfly
🥉100m Butterfly pic.twitter.com/uOoYfQTmkN— #Tokyo2020 (@Tokyo2020) August 1, 2021
मॅककियोनने टोकियो ऑलिंपिकमध्ये ४X१०० मीटर मीडले रिले, ४X१०० फ्रिस्टाईल रिले, १०० मीटर फ्रिस्टाईल आणि ५० मीटर फ्रिस्टाईल या प्रकरांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तर ४X२०० फ्रिस्टाईल, ४X१०० बटरफ्लाय आणि १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात कांस्यपदक जिंकले आहे.
यापूर्वी २०१६ साली पार पडलेल्या रिओ ऑलिंपिकमध्ये तिने १ सुवर्ण, २ रौप्य आणि १ कांस्य अशी एकूण ४ पदकं जिंकली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
सिंपल बट स्वीट!! विराट अन् अनुष्काच्या ‘त्या’ सिंपल लूकमधील फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष
“द हंड्रेड क्रिकेट स्पर्धा निरुपयोगी”, माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने केली बोचरी टीका