टोकियो ऑलिंपिकचा सातवा दिवस (२९ जुलै) भारतासाठी आनंद घेऊन आला आहे. बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी आणि तिरंदाजी यांसारख्या खेळांमध्ये भारताने आज आपली विजयी पताका फडकावली आहे. यानंतर आता भारताने जलतरणामध्येही उत्तम कामगिरी केली. भारताचा जलतरणपटू साजन प्रकाश १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात हीट-२ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला. मात्र, तो उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.
त्याने ५३:४५ सेंकद अशी वेळ नोंदवली. घानाच्या अबेकू जॅक्सनने ५३.३९ ही वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. (Indian Swimmer Sajan Prakash finishes in 2nd place in Men’s 100 Butterfly Heat 2)
#Swimming :
Sajan Prakash finish 2nd in his Heat clocking 53.45s.
Only 16 swimmers overall (out of 8 Heats) will qualify for Semis. #Tokyo2020withIndia_AllSports pic.twitter.com/tgdB0GpMIC— India_AllSports (@India_AllSports) July 29, 2021
एकूण ८ हिटमधील सर्वोत्तम वेळ नोंदवलेले १६ जलतरणपटू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतात, पण साजन वेळेच्या बाबतीत एकूण जलतरणपटूंमध्ये ४६ व्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात त्याला अपयश आले.
१०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत भाग घेणारा दुसरा भारतीय
साजन प्रकाश हा १०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत भाग घेणारा अंकुर पोझेरियानंतर दुसरा भारतीय ठरला. पोझेरियाने २००८च्या बीजिंग ऑलिंपिक्समध्ये भाग घेतला होता आणि तो ५७ व्या स्थानी होता. दोन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेणारा साजन प्रकाश हा एकमेव भारतीय जलतरणपटू ठरला आहे.
भारताच्या अन्य जलतरणपटूंची आव्हाने संपुष्टात
साजन व्यतिरिक्त माना पटेल आणि श्रीहरी नटराज हे दोन भारतीय जलतरणपटू देखील टोकियो ऑलिंपिकमध्ये सहभागी होते. मात्र, त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. रविवारी (२५ जुलै) माना पटेल महिलांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात, तर श्रीहरी पुरुषांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरले.
श्रीहरी हीट-३मध्ये ५ व्या क्रमांकावर राहिला, तर एकूण २७ व्या क्रमांकावर राहिला. तसेच माना पटेल हीट-१ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिली, तर एकूण ३९ व्या क्रमांकावर राहिली.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
-हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना