कोरोनानंतर भारतात पहिल्यांदाच स्थानिक क्रिकेटला सुरुवात झाली असून, सध्या सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीचा थरार सुरू आहे. स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून प्रत्येक सामन्यात उत्तम संघर्ष बघायला मिळत आहे. नुकताच बाद फेरीतील टप्पा पार पडला असून सेमीफायनलचे 4 संघ निश्चित झाले आहेत. आता या स्पर्धेत केवळ 3 सामने बाकी असून यानंतर नवा विजेता मिळणार आहे.
26 जानेवारी रोजी पंजाब आणि तामिनाडू संघ विजय मिळवत सेमीफायनलमध्ये पोहोचले होते. तसेच 27 जानेवारी रोजी बडोदा आणि राजस्थानने आपापले सामने जिंकत सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले आहे. सेमीफायनलचे सामने 29 जानेवारी रोजी खेळले जाणार असून, बीसीसीआयने सामान्यांची घोषणा देखील केली आहे.
पहिला सेमीफायनल सामना तमिळनाडू आणि राजस्थान संघांमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याची सुरुवात दुपारी 12 वाजता होईल. दुसरा सेमीफायनल सामना बडोदा आणि पंजाब दरम्यान होईल. हा सामना शुक्रवारी सायंकाळी सात दरम्यान खेळला जाईल. दरम्यान अंतिम सामना 31 जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजता खेळला जाणार आहे. सेमीफायन आणि अंतिम सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर पार पडणार आहेत.
मोठ्या प्रयत्नाने या स्पर्धेचे आयोजन आयपीएल लिलावा पूर्वी करण्यात आले, ज्यामुळे युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली. अनेक युवा खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी केली असून त्यांना आयपीएलमध्ये मोठी बोली लागू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
पुजाराने केला खुलासा, ‘त्या’ सामन्यात केवळ चार बोटात बॅट पकडत केली होती फलंदाजी
गोलंदाजाला चौकार पडल्यानंतर रवी शास्त्री माझ्यावर ओरडतात, भरत अरुण यांनी उलगडले गुपित
चेन्नई कसोटीद्वारे होणार हार्दिक पंड्याचे पुनरागमन, ‘इतक्या’ वर्षांपुर्वी खेळला होता शेवटचा सामना