---Advertisement---

कोहली का रहाणे, कोण आहे टीम इंडियाचा उत्कृष्ट कर्णधार?, टी नटराजनने सांगितलं नाव

On: सोमवार, जानेवारी 25, 2021 11:25 AM
---Advertisement---

नुकताच भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपला आहे. या दौऱ्यातील टी२० आणि कसोटी मालिकेत भारतीय संघाने विजयी पताका झळकावली होती. भारताचा युवा वेगवान गोलंदाज टी नटराजन याच्यासाठी ऑस्ट्रेलिया दौरा अविस्मरणीय ठरला. कारण याच दौऱ्यावर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्त्वात नटराजनचे वनडे, टी२० आणि कसोटी पदार्पण झाले. यानंतर कोहली आणि रहाणेच्या नेतृत्त्वाविषयी नटराजनने भाष्य केले आहे.

नटराजन म्हणाला की, “कोणत्याही खेळाडूसाठी कोहली आणि रहाणे सारख्या कर्णधारांच्या छत्रछायेखाली पदार्पण करणे ही खूप भाग्याची गोष्ट असते. दोघांनीही माझे पदार्पण झाल्यानंतर मला व्यवस्थितपणे सांभाळून घेतले. मला त्यांच्या नेतृत्त्वाखाली बऱ्याच सकारात्मक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यांनी मला प्रेरित करण्याचेही काम केले. कोहली आणि रहाणे हे दोघेही उत्कृष्ट कर्णधार आहेत. मला त्यांच्या नेतृत्त्वाखाली खेळून खूप चांगले वाटले.”

भारतीय संघात संधी मिळण्याची अपेक्षा नव्हती- नटराजन

पुढे बोलताना नटराजन म्हणाला की, “मी एक नेट गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलो होतो. मला अपेक्षा नव्हती की, मला भारताकडून एवढ्या लवकर क्रिकेट खेळण्याची संधी मिळेल. परंतु जेव्हा मला सांगण्यात आले की, मला वनडे संघात स्थान मिळाले आहे. त्यानंतर मी खूप दबावात आलो होतो. परंतु मला संधीचा लाभ घ्यायचा होता. त्यामुळे मी धैर्याने मैदानावर उतरलो. यावेळी आमचे संघ प्रशिक्षक आणि सर्व सहकाऱ्यांनी मला खूप मदत केली. त्यांनी माझे समर्थन केले आणि मला खूप प्रोत्साहित देखील केले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी एवढे यश साध्य करू शकलो आहे.”

नटराजनची ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कामगिरी

नटराजन हा आयपीएल २०२०चा भाग होता. यादरम्यान नटराजनच्या घरी चिमुकल्या परीचे आगमन झाले होते. परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी आपली भारतीय संघात निवड झाल्याने नटराजन मायदेशी परतू शकला नाही. पुढे मनुका ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या सामन्यातून नटराजनने वनडे पदार्पण केले. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने २ विकेट्स घेतल्या.

त्यानंतर टी२० पदार्पण करत नटराजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी२० सामने खेळले. यादरम्यान दमदार कामगिरी करत त्याने ६ विकेट्स चटकावल्या. एवढेच नव्हे तर, ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात कर्णधार रहाणेने त्याची अंतिम ११ जणांच्या पथकात निवड केली. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पण करत नटराजनने ४ विकेट्सची कामगिरी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

“जर वॉशिंग्टन सुंदरने हट्ट केला नसता, तर…”, रिषभ पंतने व्यक्त केली खंत

फ्लाईंग बॅट, ब्रेकिंग बॅट, क्रॅकिंग बॅट! आयसीसीने शेअर केला तुटलेल्या बॅट्सचा मजेशीर व्हिडिओ

घरी पैसे नसल्याने आईने स्वत: शिवले होते पुजारासाठी बॅटिंग पॅड, त्यागाची कहाणी आहे अतिशय भावनिक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---