कोरोनानंतर क्रिकेट हळुहळू पूर्वपदावर येत आहे. जगभरातील अनेक मोठ्या लीग स्पर्धांना देखील आता सुरुवात झाली आहे . काही दिवसांपूर्वीच अबुधाबी येथे टी 10 लीगला सुरवात झाली आहे. 10-10 षटकाच्या या क्रिकेटमध्ये रसिकांना चौकार – षटकारांची आतषबाजी बघायला मिळते.
याच स्पर्धेमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सामान्यात वेस्ट इंडिजचा आक्रमक सलामीवीर इवन लुईसने षटकारांची आतषबाजी करत एकाच षटकात तब्बल 5 षटकार ठोकले.
टी 10 लीग मध्ये नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात दिल्ली बुल्सकडून खेळताना मराठा अरेबियन्स विरुद्ध लुईसने ही कामगिरी केली. 88 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डावातील पाचव्या षटकात लुईसने अरेबियन्सचा गोलंदाज मुख्तार अली विरुद्ध रौद्र रूप धारण केले. लुईसने पहिल्या दोन चेंडूवर सलग षटकार ठोकले. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा काढल्या. यानंतर पुन्हा सलग 3 षटकार ठोकले. या षटकात 1 वाइड चेंडू असल्याने तब्बल 33 धावा निघाल्या.
लुईसने सामन्यात केवळ 16 चेंडूत 55 धावांची शानदार खेळी केली.यात त्याने 2 चौकार व 7 गगनचुंबी षटकार ठोकले. लुईसच्या या शानदार खेळीमुळे दिल्ली बुल्सने सामन्यात सहज विजय मिळवला.
सामान्याचा विचार केला असता, प्रथम फलंदाजी करणाऱ्या मराठा अरेबियन्सने निर्धारित 10 षटकात केवळ 87 धावा केल्या. अरेबियन्सकडून कर्णधार मोसादिक हुसेनने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. प्रतिउत्तरात दिल्ली बुल्सने लुईसच्या शानदार खेळीमुळे केवळ पाचव्या षटकातच विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्या’दिवशी चेन्नईमधील चेपॉक मैदानात सेहवागने वॉर्नची अक्षरशः पिसे काढली
आयपीएल लिलाव : आयपीएलमध्ये आत्तापर्यंत महागडे ठरलेले ५ भारतीय खेळाडू