मैदानाच्या मधोमध अचानक एखादी गाडी आली, यावर खेळाडू किंवा चाहत्यांची प्रतिक्रिया कशी असेल, हे समजणे अवघड नाही. हे पाहून त्यांना आश्चर्यच वाटेल. असाच काहीसा प्रकार इंग्लंमध्ये खेळल्या जात असलेल्या टी-२० ब्लास्ट (T20 Blast) स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात घडला. सरे आणि यॉर्कशायर यांच्यात झालेल्या सामन्यात चेंडू रिमोट कंट्रोलद्वारे चालणाऱ्या कारने मैदानात आणण्यात आला होता. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
काळानुसार क्रिकेटमध्येही बदल घडताना आपण पाहिले आहे. तंत्रज्ञानानेही हा खेळ बदलत चालला आहे. याचाच प्रत्यय इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० ब्लास्टच्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दिसला आहे. या सामन्यासाठी लागणारा चेंडू कारमधून मैदानात आणण्यात आला होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, कारच्या छतावर एक चेंडू ठेवण्यात आला आहे. ती कार एक व्यक्ती रिमोट कंट्रोलद्वारे तो चालवत आहे. अचानक ही कार धावते आणि मग थेट मैदानात पोहोचते. मैदानाच्या मधोमध छोटी कार पाहून खेळाडूही आश्चर्य चकित झाले आहेत.
क्रिकेटमध्ये सर्वसाधारणपणे सामना सुरू होण्यापूर्वी चेंडू पंचाच्या हातात असतो. परंतु, टी-२० ब्लास्टमध्ये चेंडू मैदानावर पोहचवण्यासाठी आता अनोखा प्रकार वापरला गेला. तो चाहत्यांना फार आवडला देखील आहे.
🚗 @Vitality_UK bringing out the match ball in style 😎 pic.twitter.com/rks0SBXabZ
— Vitality Blast (@VitalityBlast) July 6, 2022
सामन्यासाठी मैदानावर चेंडू रिमोट कंट्रोलच्या गाडीवर आणला गेल्याचे हा काही पहिला क्षण नाही. फुटबॉलच्या अनेक सामन्यांमध्येही चेंडू रिमोट कंट्रोलच्या गाडीवर आणला जातो. क्रिकेटच्या मैदानावर हे मात्र पहिल्यांदाच घडले आहे.
यॉर्कशायर आणि सरे यांच्यात खेळला गेलेला पहिला उपांत्यपूर्व सामना अतिशय रोमांचक झाला. सरेला विजयासाठी शेवटच्या ६ चेंडूत ५ धावांची गरज होती. पण, यॉर्कशायरने हा सामना १ धावाने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड विलीच्या नेतृत्वाखाली यॉर्कशायर संघाने २० षटकांत ५ गडी गमावत १६० धावा केल्या. यॉर्कशायरकडून टॉम कोहलरने ४८ चेंडूत ६२ धावा केल्या. सरेसाठी गस ऍटकिन्सनने ४ षटके टाकत २८ धावा देऊन २ विकेट घेतल्या.
यॉर्कशायरने दिलेल्या १६१ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना सरेने ७ गडी गमावत १५९ धावा केल्या. त्यामुळे त्यांना १ धावाने पराभूत व्हावे लागले. सरेकडून टॉम कुरनने ३६ आणि लॉरी इव्हान्सने ३५ धावा केल्या. शेवटच्या षटकात जेमी ओव्हरटनने २१ चेंडूत ४० धावा केल्या. पण त्यालाही सरेला विजय मिळवून देता आला नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सिंधूवर भारी पडतीये ‘ही’ खेळाडू, सलग सातव्यांदा स्विकारावा लागला पराभव
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनी म्हणजे भारतीय क्रिकेटमधील मानाचा तुराच
‘सर, मी जास्त डोकं लावत नाही’, पत्रकाराने विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर हार्दिक पंड्याचं भारी उत्तर