हेडिंग्ले | रशियात होत असलेल्या फिफा विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यासाठी बुधवारी (11 जुलै) यॉर्कशायर विरुद्ध डर्बीशायर सामना पुढे ढकलण्यात आला आहे.
टी-20 ब्लास्ट स्पर्धेत बुधवारी (11 जुलै ) यॉर्कशायर विरुद्ध डर्बीशायर सामना होणार होता मात्र याचवेळी फिफा विश्वचषकात इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत पोहचला आहे. इंग्लंडचा उपांत्य फेरीचा सामनाही बुधवारी (11 जुलै) क्रोएशिया विरुद्ध होणार आहे.
त्यामुळे टी-20 ब्लास्ट स्पर्धेत बुधवारी (11 जुलै ) यॉर्कशायर विरुद्ध डर्बीशायर होणारा सामना आता 30 जुलैला होणार आहे.
इंग्लंडचा फिफा विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना आणि टी-20 ब्लास्ट स्पर्धेतील यॉर्कशायर विरुद्ध डर्बीशायर या सामन्यातील प्रेक्षक विभाजन टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे यॉर्कशायर कौंटी क्रिकेट क्लबच्या सुत्रांनी सांगितले.
फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना 15 जुलैला होणार आहे. त्यासाठी विंम्बलडन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा अंतिम सामना पुढे ढकलण्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र सोमवारी (9 जुलै) ऑल इंग्लंड टेनिस क्लबने विंम्बलडन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात कोणताही बदल होणार नाही असे स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हरमनप्रीत कौरचे पोलिस उपअधिक्षकपद गेले, अर्जून पुरस्कारही जाणार?
जूलै महिन्यात जन्माला या, टीम इंडियाचा कर्णधार बना!