क्रिकेटमध्ये इंग्लिशमधील एक संज्ञा खूप प्रसिद्ध आहे. ती अशी की, ‘Catches win matches’ म्हणजे जो संघ अधिकाधिक झेल टिपतो तो संघ बहुतेकदा विजयी ठरतो. क्रिकेट मैदानावर अनेक खेळाडू अनेकवेळा अशक्यप्राय झेल टिपतात, ज्याचा कोणी विचार देखील केला नसेल. असेच एक दृश्य ‘व्हिटॅलिटी टी20 ब्लास्ट’मध्ये दिसून आले. या स्पर्धेत इंग्लडच्या टॉम करेनने एक शानदार झेल टिपला.
व्हिटॅलिटी टी20 ब्लास्ट स्पर्धेत मिडलसेक्स विरुद्ध सर्रे या दोन संघांमध्ये एक सामना सुरू होता. या सामन्यात टॉम करनने जबरदस्त झेल टिपला. मिडलसेक्सच्या डावादरम्यान त्यांचा सलामी फलंदाज स्टीफन एस्किनाजिकने डेनीयल मोरीयार्टीच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु चेंडु लांब जाण्यापेक्षा हवेत जास्त उंच गेला. तेव्हा चेंडूकडे करन धावत गेला आणि हवेत उडी मारून त्याने झेल घेतला.
सोशल मीडियावर व्हिडिओ होतोय व्हायरल
टॉम करनचा हा झेल सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. तसेच सोशल मीडियावर सुद्धा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पसरत असून लोक या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पसंत करीत आहे. या सामन्यात करनच्या सर्रे संघाने 54 धावांनी विजय देखील मिळवला. सर्रेने प्रथम फलंदाजी करतांना 20 षटकात 7 बळी गमावून 224 धावांचे विशाल लक्ष्य उभे केले. त्याला प्रत्युउत्तर देताना मिडलसेक्स संघ 9 बळी गमावून फक्त 169 धावांपर्यंतच मजल मारू शकला.
https://twitter.com/AbdullahNeaz/status/1403522481592279041?s=20
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो करन
भाऊ टॉम करन यावर्षी आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल संघाकडून खेळत आहे. दिल्लीतर्फे त्याचे प्रदर्शन साधारण असून आतापर्यंत काही तो आपली कमाल दाखवू शकलेला नाही. यापूर्वी तो राजस्थान संघाकडून खेळला आहे. टॉम करनचा भाऊ सॅम करन चेन्नईकडून धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसून येतो.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या पराभवाचा दावा करणाऱ्या वॉनला जाफरने चांगलेच फटकारले; म्हणाले, ‘चल.. तू निघ’
RRच्या ‘या’ शिलेदाराचे धोनीसोबत आहे बालपणीपासूनचे नाते, वडीलही माहीचे होते सहकारी
कसोटी अजिंक्यपद जिंकत टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी, ‘हे’ मोठे विक्रमही निशाण्यावर