इंग्लंडमध्ये सध्या टी20 ब्लास्ट स्पर्धा खेळली जात आहे. गुरुवारी (5 सप्टेंबर) स्पर्धेचा तिसरा क्वार्टर फायनल सामना खेळला गेला. या सामन्यात समरसेट आणि नॉर्थम्पटनशर संघ आमनेसामने होते. या सामन्यात नॉर्थम्पटनशरच्या विकेटकीपरकडून एक छोटीची चूक झाली, ज्याची शिक्षा मात्र गोलंदाजाला मिळाली. विकेटकीपरच्या चुकीमुळे अंपायरनं नो बॉल दिला, ज्यानंतर मिळालेल्या फ्री हिटवर फलंदाजानंं षटकार ठोकला.
क्रिकेटमध्ये असे अनेक नियम आहेत, ज्याबद्दल अनेक चाहत्यांना फारशी माहिती नाही. मात्र कधीकधी या नियमांचा प्रभाव एखाद्या सामन्यावर पडतो. टी20 ब्लास्ट स्पर्धेच्या तिसऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात असंच घडलं.
झालं असं की, समरसेटच्या फलंदाजीदरम्यान 14व्या षटकात नॉर्थम्पटनशरचा गोलंदाज सैफ यांनं एक शानदार चेंडू टाकला. या चेंडूवर फलंदाज टॉम कोहलर कॅडमोर गोंधळात पडला आणि तो शॉट खेळू शकला नाही. या दरम्यान त्याचे पाय क्रिजच्या बाहेर गेले, तेव्हा नॉर्थम्पटनशरचा विकेटकीपर लुईस मॅकमॅनसनं चपळाई दाखवत लगेच त्याच्या विकेट उडवल्या.
मैदानावरील अंपायरनं यासाठी तिसऱ्या अंपायरची मदत घेतली. मात्र तिसऱ्या अंपायरनं जेव्हा रिप्लेमध्ये पाहिलं, तेव्हा दिसलं की, लुईसनं जेव्हा चेंडू पकडला, तेव्हा त्याच्या ग्लब्जचा काही भाग विकेटपुढे होता. क्रिकेटच्या नियमानुसार, विकेटकीपरनं असं केल्यास तो नो बॉल दिला जातो. त्यामुळे तिसऱ्या अंपायरनं हा नो बॉल घोषित केला. यानंतर समरसेटला पुढच्या चेंडूवर फ्री हिट मिळाली, ज्यावर फलंदाज टॉम कोहलर कॅडमोरनं षटकार हाणला.
आयसीसीसच्या नियमानुसार, विकेटकीपरला क्रिजवरील विकेटच्या मागे उभं राहणं बंधनकारक असतं. जोपर्यंत चेंडूचा बॅटला संपर्क होत नाही, तोपर्यंत त्याला विकेटच्या समोर येण्याची परवानगी नसते. किंवा चेंडू विकेटच्या मागे गेल्यानंतरच विकेटकीपर विकेटच्या पुढे येऊ शकतो. यादरम्यान जर फलंदाजा शॉट खेळण्याच्या आधीच विकेटकीपरनं ग्लब्ज विकेटच्या पुढे आणले, तर अंपायर याला नो बॉल घोषित करू शकतो. अशा परिस्थितीत फलंदाज बाद झाला असला, तरी तो नॉट आऊट असतो. क्रिकेटच्या या नियमामुळे हा नो बॉल दिल्या गेला आणि कॅडमोर नाबाद राहिला.
View this post on Instagram
हेही वाचा –
मराठमोळ्या ऋतुराजची आंध्र प्रदेशात क्रेझ! भेट घेण्यासाठी चाहता सुरक्षा मोडून थेट मैदानात
आयपीएलमधील या 3 संघांच्या रडारवर शतकवीर मुशीर खान, लावू शकतात मोठी बोली
भारतात पोहोचताच न्यूझीलंडची मोठी खेळी; टीम इंडियाच्या अनुभवी खेळाडूला प्रशिक्षक बनवले