टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानला 5 विकेट्सने नमवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. रविवारी (दि. 13 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या या सामन्याबद्दल इंग्लंडच्या ‘गोलंदाजांनी रोखलं आणि फलंदाजांनी चोपलं’ असंच म्हणावं लागेल. सॅम करनने शानदार गोलंदाजी केल्यानंतर बेन स्टोक्स याने नाबाद अर्धशतक झळकावत इंग्लंडला विश्वचषक विजेता बनवले. या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर हा निराश दिसला. मात्र, त्याला त्याच्या संघाचा अभिमानही वाटत असल्याचे तो म्हणाला. त्याने संघाला पाठिंबा देत म्हटले की, आपण आता भारतात विश्वचषक जिंकू. खरं तर, वनडे विश्वचषक पुढील वर्षी भारतात खेळला जाणार आहे.
शोएब अख्तर याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत तो म्हणाला की, “तुम्ही शानदार काम केले. तुम्ही स्पर्धेबाहेर होण्याच्या जवळ होते. मात्र, तरीही अंतिम सामना खेळला. पाकिस्तानच्या गोलंदाजी विभागाने संपूर्ण विश्वचषकादरम्यान चांगली कामगिरी केली. काही ठिकाणी लक होता, पाकिस्तानने चांगला खेळ दाखवला आणि तो तिथे जाण्याचा हक्कदार होता. शाहीनचे दुखापतग्रस्त होणे महत्त्वाचा क्षण होता, पण ठीक आहे. आता आपल्याला इथून पुढे खाली घसरायचे नाहीये.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “बेन स्टोक्स याने टी20 विश्वचषक 2016मध्ये गोलंदाजी करताना षटकार दिले होते. त्याच्यामुळे इंग्लंड सामना हारला होता. आज संघाला विश्वचषक जिंकून देऊन तो यातून मुक्त झाला आहे. पाकिस्तान मी तुमच्यासोबत उभा आहे. मी निराश आहे आणि दुखीही आहे, पण ठीक आहे. आपण राष्ट्र म्हणून उभे आहोत. निवांत व्हा आता आपण भारतात विश्वचषक जिंकू.”
Dil dukha hai lekin, toota toh nahi hai. pic.twitter.com/E9fFbpECZe
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 13, 2022
या विजयासह इंग्लंड दुसऱ्यांदा चॅम्पियन बनला. इंग्लंडने 2010मध्ये पॉल कॉलिंगवूडच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजमध्ये टी20 विश्वचषकाचे पहिल्या विजेतेपद जिंकले होते. दुसरीकडे, पाकिस्तान संघ आपला तिसरा अंतिम सामना खेळताना दुसऱ्या टी20 विश्वचषक विजेतेपदाच्या शोधात होते, पण त्यांना यामध्ये अपयश आले. (t20 wc shoaib akhtar shares message for pakistan cricket team read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ 5 कमतरतांमुळे बाबर बनू शकला नाही इम्रान खान, रिझवाननेही दिला धोका!
चॅम्पियन बनताच इंग्लंडवर पडला पैशांचा पाऊस, भारताच्या वाट्याला आले इतके कोटी?