आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 13वा सामना आज (7 मे) रोजी कॅनडा (Canada) विरुद्ध आयर्लंड (Ireland) यांचा सामना रगणार आहे. न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकात कॅनडा आणि आयर्लंड हे दोन्ही संघ ग्रुप-अ मध्ये समाविष्ट आहेत. आयर्लंडनं टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
कॅनडा- आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (यष्टीरक्षक), दिलप्रीत बाजवा, साद बिन जफर (कर्णधार), डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी, जेरेमी गॉर्डन
आयर्लंड- अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, क्रेग यंग
दोन्ही संघांच्या हेड-टू-हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर कॅनडा आणि आयर्लंड दोन्ही संघ टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यामध्ये दोन्ही संघांनी 2-2 वेळा बाजी मारली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात कॅनडा आणि आयर्लंड दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
दोन्ही संघ यंदाच्या टी20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पराभूत झाले आहेत. कॅनडा संघाचा यजमान अमेरिकेनं पहिल्याच सामन्यात धुव्वा उडवला. तर आयर्लंड संघाला भारताकडून पराभव पत्करावा लागला. नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावरच्या खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं, तर या मैदानावर यंदाच्या टी20 विश्वचषकातील 2 सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये श्रीलंकेची धावसंख्या 77 झाली आहे तर आयर्लंडची धावसंख्या 96 झाली आहे. दोन्ही सामन्यात एकही संघ 100 धावांचा आकडा गाठू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी, भारतीय खेळाडूंची युवराज सिंग सोबत डिनर पार्टी! फोटो व्हायरल
भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी भारत करणार का संघात बदल?
बाबर आझमच्या नावावर लज्जास्पद विक्रमाची नोंद!