टी-२० विश्वचषकात शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघांमध्ये स्पर्धेतील २४ वा सामना खेळला गोला. या सामन्यात पाकिस्तानने पाच विकेट्स राखून अफगाणिस्तानचा पराभव केला. या विजासोबतच पाकिस्तनाने विश्वचषकातील त्यांची विजयाची हॅट्रिक पूर्ण केली. तसेच त्यांचे विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यातील त्यांचे स्थान जवळपास पक्के केले आहे. पाकिस्तान संघ अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर एन्जॉय करताना पाहिले गेले आहे आणि या फोटोमध्ये संघातील सर्व खेळाडू रिलॅक्स दिसत आहेत.
विश्वचषकात ग्रुप दोनमध्ये सहभाग असलेला पाकिस्तान संघ त्यांचे पहिले तिनही सामने जिंकला आहे. यामध्ये पाकिस्तानने त्यांच्या पहिल्या सामन्यात भारतावर १० विकेट्स राखून मोठा विजय मिळवला होता. विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडवर पाच विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर आता अफगाणिस्तानलाही पाकिस्तानने पाच विकेट्स राखून पराभूत केले आणि विजयाची हॅट्रिक पूर्ण केली.
यानंतर संघाचा कर्णधार बाबर आझमने त्याच्या सोशल मीडियावर एक खास फोटो शेवर केला आहे, ज्यामध्ये संपूर्ण पाकिस्तानी संघ दिसत आहे. फोटोतील सर्व पाकिस्तानी खेळाडू संघाच्या चांगल्या प्रदर्शनामुळे रिलॅक्स दिसत आहेत. बाबरने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझ्या दुसऱ्या परिवारासोबत एक दिवसाची सुट्टी.”
A day off with my other family 😇🙏🏼 pic.twitter.com/HZUSAbs3Gi
— Babar Azam (@babarazam258) October 30, 2021
दरम्यान, पाकिस्तानने विश्वचषकातील त्यांच्या अफगणिस्तानसोबतच्या तिसऱ्या सामन्यात प्रथम गोलंदाजी केली होती. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने फलंदाजी करत असताना २० षटकांमध्ये सहा विकेट्सच्या नुकसानावर १४७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्ताने हे लक्ष्य १९ षटकांमध्ये आणि पाच विकेट्सच्या नुकसानावर गाठले आणि विजय मिळवला. पाकिस्तानसाठी आसिफ अलीने जोरदार फटकेबाजी केली. त्याने अवघ्या सात चेंडूत २५ धावा केल्या आणि सहा चेंडू शिल्लक ठेवून संघाला विजय मिळवून दिला. आसिफने दिलेल्या योगदानासाठी त्याला सामनावीर पुरस्कार दिला गेला.
गुणतालिकेचा विचार केला, तर पाकिस्तान संघ तीन विजयासह ग्रुप दोनमध्ये पहिल्या स्थानावर आहे. गुणतालिकेत पाकिस्तानकडे सहा गुण आणि +०.६३८ नेट रन रेट आहे. पाकिस्तानने स्पर्धेत आजून एक विजय मिळवल्यानंतर त्यांचे उपांत्य सामन्यातील स्थान पक्के होईल. दुसरीकडे भारताने त्यांचे पहिले दोन्ही सामने गमावले आहेत आणि गुणतालिकेत संघ पाचव्या स्थानावर आहे. भारतीय संघ जवळपास स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
स्तुत्य उपक्रम! पाकिस्तानच्या प्रत्येक विजयाचा होणार देशातील विद्यार्थ्यांना फायदा; वाचा सविस्तर
पाकिस्तानविरुद्धचा पराभव जिव्हारी लागल्याने अचानक घेतली निवृत्ती, असगर अफगानचा धक्कादायक खुलासा