---Advertisement---

क्या बात है! पाकिस्तानी फलंदाजाने करून दिली १५ वर्षे जुन्या एमएस धोनीची आठवण; कसं ते घ्या जाणून

On: शनिवार, ऑक्टोबर 30, 2021 7:57 PM
---Advertisement---

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) आमना सामना झाला. यामध्ये पाकिस्तानने पाच विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरला आसिफ अली. आसिफने या सामन्यात अवघ्या ७ चेंडूत चार षटकारांच्या मदतीने नाबाद २५ धावा केल्या. असिफने केलेल्या जबरदस्त खेळीच्या जोरावर पाकिस्तानने सहा चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळवला. आसिफने सामन्यात विजय मिळवल्यानंतर ज्याप्रकारे त्याचा आनंद साजरा केला, ते पाहून चाहत्यांनी त्याची तुलना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत केली आहे.

पाकिस्तानला सामन्यात जिंकण्यासाठी १२ चेंडूत २४ धावांची आवश्यकता होती. आसिफला स्वत:च्या क्षमतेवर विश्वास होता, त्यामुळे त्याने १८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली नाही. पुढच्या षटकात तो स्ट्राइकवर आला होता. त्याने या षटकात चार जबरदस्त षटकार मारले आणि पाकिस्तानला विजय मिळवून दिला. आसिफने विजयी षटकार मारल्यानंतर धोनीप्रमाणेच गन शॉट सेलिब्रेशन केले. त्याने केलेल्या या सेलिब्रेशननंतर चाहत्यांच्या एमएस धोनीविषयीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

धोनीने २००५ साली खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात महत्वाची खेळी केली होती. त्याने या सामन्यात नाबाद १८३ धावा केल्या होत्या आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली होती. या सामन्यात भारतीय संघाने धोनीने केलेल्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने दिलेल्या २९९ धावांच्या लक्ष्याला सहज गाठले होते आणि २३ चेंडू शिल्लक ठेऊन विजय मिळवला होता. धोनीने या सामन्यात केलेली धावसंख्या त्याची एकदिवसीय क्रिकेटमधीस सर्वाधिक धावसंख्या आहे. सामना जिंकल्यानंतर धोनीने गन शॉट सेलिब्रेशन केले होते, ज्याची आसिफने आता पुन्हा आठवण करून दिली आहे.

आसिफने धोनीप्रमाणे विजयाचा आनंद साजरा केल्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर या दोघांची तुलना करायला सुरुवात केली आहे. आसिफचे सामन्यानंतरचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होऊ लागले आहेत. एका भारतीय चाहत्याने धोनी आणि आसिफ या दोघांचा गन शॉट सेलिब्रेशनचा घोटो एकत्र जोडला आहे आणि तो शेअर केला आहे. आसिफ पाकिस्तान सुपर लीगमध्ये ज्या संघासाठी खेळतो, तो संघ इस्लमाबाद युनाटेडनेही त्याचा एक फोटो शेअर केला आहे.

https://twitter.com/IsbUnited/status/1454151194138525702

https://twitter.com/apwaadi/status/1454168103747678208

https://twitter.com/HamlaVeep/status/1454160675111014404

https://twitter.com/zshalyrizvi/status/1454155501466497035

पाकिस्तानने या टी२० विश्वचषकात सलग तीन सामने जिंकून सुपर १२ फेरीतील दुसऱ्या गटात अव्वल स्थान मिळवले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय खेळाडूंनी घेतला बीचवर वॉलीबॉल खेळण्याचा आनंद, पाहा व्हिडिओ

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज म्हणतोय, ‘भारताच्या वरच्या फळीला उध्वस्त करण्याचा प्रयत्न करेल’

श्रेयस अय्यर सोडणार दिल्ली कॅपिटल्सची साथ? ही गोष्ट ठरू शकते कारणीभूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---