टी२० विश्वचषकात रविवारी (३१ ऑक्टोबर) भारतीय संघाला सलग दुसरा पराभव मिळाला. यापूर्वी भारताला त्याच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून १० विकेट्सने पराभव मिळाला होता. त्यानंतर आता या सामन्यात न्यूझीलंडने भारताला ८ विकेट्स राखून पराभूत केले. संघाने त्याचे पहिले दोन्ही सामने गमावल्यामुळे उपांत्य सामन्याच्या शर्यतीमधून भारत जवळपास बाहेर पडला आहे. त्यामुळे चाहते खूपच निराश झाले आहेत. काही चाहते सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत आणि विराट कोहलीसह इतर भारतय संघाला लक्ष करत आहेत. अशात दिनेश कार्तिकने भारतीय चाहत्यांना संघाविषयी सहानुभूती दाखवण्याची विनंती केली आहे
कार्तिक क्रिकबज वेबसाइटसोबत चर्चा करत होता. यावेळी त्याने भारतीय संघाच्या निराश चाहत्यांना एक विनंती केली आहे. तो यावेळी म्हणाला की, “जेव्हा तुम्ही तुमच्या खोलीत जाल, तेव्हा तुम्ही स्वत: तुमच्या सोबत असाल. तुम्हाला माहीत आहे की, तुम्ही स्वत:ला खूप सारे प्रश्न विचारत असाल. तुम्ही आतमधील खूप साऱ्या राक्षसांशी डील करत असाल. मी आशा करतो की, भारतीय संघाचे सर्व समर्थक या गोष्टीला समजून घेतील आणि संघाप्रती थोडी मवाळ भूमिका घेतील, तसेच भारतीय संघाप्रती थोडी सहानुभूती ठेवतील.”
“आपल्याकडे सर्वात चमत्कारी कर्णधाराच्या रूपात विराट कोहली आणि सर्वात महान लीडरच्या रूपात महेंद्रसिंग धोनी संघासोबत आहे. अशात ते स्वत: अशाप्रकारच्या परिस्थितीशी चांगल्या प्रकारे डील करू शकतात. त्याव्यतिरिक्त रवी शास्त्रीही संघासोबत आहे, जे संघामध्ये उर्जा भरण्यासाठी त्याठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की, संघासोबत खूप सकारात्मक गोष्टी उपस्थित आहे,” असेही कार्तिक पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली आणि संघाला प्रथम फलंदाजी करावी लागली. न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय अगदी योग्य ठरला आणि त्यांनी भारतीय संघाला अवघ्या ११० धावांपर्यंत मजल मारता आली. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने अवघ्या १४.३ षटकात विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
कठीण काळात पीटरसन उभा राहिला टीम इंडियाच्या पाठीशी; हिंदीत ट्विट करत म्हणाला…
‘सुपरमॅन’ नीशम! बाऊंड्री लाईनजवळ हवेत उडी मारत अडवला हार्दिक पंड्याचा षटकार, पाहा व्हिडिओ
‘…आणि लोकांना रोहित कर्णधार म्हणून हवा आहे’, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर ‘हिटमॅन’ जोरदार ट्रोल