भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज विरेंद्र सेहवागने रविवारी (२४ ऑक्टोबर) होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यासाठी हार्दिक पांड्याला त्याची पहिली पसंती दिली आहे. सेहवागच्या मते हार्दिक गोलंदाजी करू शकत नसला तरी, त्याच्याकडे सामना एकतर्फी करण्यीच क्षमता आहे. भारत आणि पाकिस्तान संघ रविवारी संध्याकाळी ७.३० वाजता दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आमने सामने असणार आहेत. या सामन्यापूर्वी सेहवागने हे विधान केले आहे.
सेहवाग भारत पाकिस्तान सामन्यापूर्वी क्रिकबजसोबत बोलत होता. जर हार्दिक गोलंदाजी करू शकला तर, ही खूपच चांगली गोष्ट असेल, असे सेहवाग म्हणाला आहे. तसेच तो जोपर्यंत चांगली फलंदाजी करत आहे तोपर्यंत त्याला संघात कायम ठेवले पाहिजे, असे मतही सेहवागने मांडले आहे.
यावेळी सेहवाग म्हणाला की, “तो माझ्या संघात राहील. तो त्याप्रकारचा फलंदाज आहे की, जर तो चालला तर सामन्याला एकतर्फी करतो. सोबतच तो सामन्याचा शेवटही करतो. त्याच्याकडे ही क्षमता आहे, जी त्याने अनेकदा दाखवली आहे. होय, जर तो गोलंदाजीसाठी फिट झाला तर, ही खूपच चांगली गोष्ट असेल.”
“तुम्ही सामन्यात पाच गोलंदाज आणि हार्दिक पांड्यासोबत उतरायला पाहिजे. एकतर त्याने गोलंदाजी करावी किंवा टॉप ओर्डरमधील कोणीतरी काही षटके टाकवीत, हा माझ्यासाठी योग्य संघ आहे. त्याच्या फलंदाजीमुळे थोडी चिंता होऊ शकते. जर तो चांगल्या फॉर्ममध्ये नाहीये किंवा नेटमध्ये चांगली गोलंदाजी करू शकत नसेल तर, तुम्हाला इतर पर्यायांकडे पाहावे लागेल, नाहीतर तो माझी पहिली पसंती असेल,” असेही सेहवाग म्हटला आहे.
भारत आणि पाकिस्तान संघात यापूर्वी शेवटचा सामना २०१९ मध्ये खेळला गोला होता. या सामन्यात हार्दिकने १९ चेंडूत २६ धावांची खेळी केली होती. भारताने पाच विकेट्सच्या नुकसानावर ३३६ धावा केल्या होत्या. हार्दिकने या सामन्यात आठ षटके टाकली आणि यामध्ये मोहम्मद हफीज आणि शोएब मलिक या दोघांचे विकेट्सही घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
‘जर ते जिंकले तर हृदय तुटतील, आपण जिंकलो तर टीव्ही’, इरफानने उडवली पाकिस्तानी चाहत्यांची खिल्ली
भारत-पाक सामन्यापूर्वी झोमॅटोने साधला मौका; पाकिस्तानी खेळाडूंना दिली ‘ही’ ऑफर