टी-२० विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी (३१ ऑक्टोबर) आमना सामना होणार आहे. या दोन्ही संघांना त्यांच्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. पाकिस्तानने विश्वचषकातील त्याचे पहिले तीन सामने जिंकले असून उपांत्य सामन्यातील स्थान जवळपास पक्के केले आहे. अशात उपांत्य सामन्यात जागा पक्की करण्याच्या दृष्टीने भारत आणि न्यूझीलंड संघांसाठी हा सामना जिंकणे महत्वाचे झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर न्यूझीलंडच्या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्वाचे बदल केले जाऊ शकतात. हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारच्या संघातील स्थानाविषयी मागच्या काही दिवसांपासून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्वाचे बदल केले जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीप्रमाणे, या सामन्यासाठी शार्दुल ठाकुरला संधी दिली जाऊ शकते. तसेच फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाऊ शकते. नेहमीप्रमाणे या सामन्यासाठीही सलामीवीराच्या रूपात रोहित शर्मा आणि केएल राहुल दिसू शकतात. त्यांनतर तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली आणि चौथ्या क्रमांकासाठी सूर्यकुमार यादव खेळू शकतात.
त्यानंतर पाचव्या क्रमांकासाठी रिषभ पंत आणि सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्यासा खेळवले जाऊ शकते. मागच्या सामन्या हार्दिकच्या आधी रवींद्र जडेजाला मैदानात उतरवले गेले होते, आता या सामन्यात कोणता खेळाडू आधी खेळतो हे पाहावे लागणार आहे. भुवनेश्वर कुमारच्या जागी जर शार्दुल ठाकुरला संधी दिली गेली, तर तो फलंदाजीसाठी वरती योऊ शकतो.
वरुण चक्रवर्तीचा विचार केला, तर त्याने मागच्या सामन्यात काही समाधानकारक प्रदर्शन केलेले दिसत नाही. त्यामुळे त्याच्या जागी अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला संधी दिली जाऊ शकते. याव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीवर या सामन्यात विकेट्स घेण्याची जबाबदारी असणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध सामन्यासाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन :
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर किंवा भुवनेश्वर कुमार, वरुण चक्रवर्ती किंवा रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषक: गोलंदाजांनी रोखलं, फलंदाजांनी चोपलं! इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सने एकतर्फी विजय
टी२० विश्वचषक: हसंगाच्या हॅट्रिकवर मिलरचे षटकार भारी! दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर ४ विकेट्सने विजय






