टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ बुधवारी (८ सप्टेंबर) घोषित होऊ शकतो. यामध्ये भारताच्या १५ सदस्यांच्या संघात ष्टपैलू कृणाल पांड्याचे नाव असू शकते. क्रिकेटच्या काही दिग्गजांचे म्हणणे आहे की, त्याला टी२० विश्वचषकासाठी संघात संधी मिळू शकते. तर काहींचे म्हणणे आहे त्याला संधी नाही मिळणार. तत्पूर्वी तो एका मुलाखतीत त्याच्या संघातील भूमिकेविषयी बोलला आहे.
टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा होण्याआधी कृणाल पांड्याने क्रिकइंफोला एक मुलाखत दिली आहे. त्याने मुलाखतीत म्हटले आहे की, तो एक अष्टपैलू आहे, जो की फलंदाजीही करू शकतो आणि गोलंदाजीही. त्याचे असे म्हणणे आहे की, त्याला ‘वन डायमेंशनल खेळाडू’ बनायचे नाही, त्यामुळे तो त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही कौशल्यांवर काम करतो आहे.
तो नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यात भारतीय संघाचा भाग होता. तो या दौऱ्यात दुसऱ्या वनडे सामन्यात कोरोना पाॅझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे तो उर्वरित सामन्यांना मुकला होता. आता तो आयपीएल २०२१ च्या टप्प्यात खेळताना दिसणार आहे.
कृणाल क्रिकइंफोशी बोलताना म्हणाला, “मी आधीही बोललो आहे की, ज्या गोष्टींची संघाला गरज असते ती गोष्ट करायला मी तयार आहे. मला वाटते की. मी प्राॅपर फलंदाज आहे, जो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. मी ३ ते ७ क्रमांकापर्यंत फलंदाजी करू शकतो आणि सामनाही संपवू शकतो. मी हे आधीही केले आहे. जर २० धावांवर ३ विकेट्स पडल्या असतील. तर मला माहित आहे की, मला इनिंग बिल्ड करायची आहे. मला माहित आहे की, मी एक चांगला फलंदाज आहे आणि मला चेंडू वाया घालवायचे नाहीत.”
गोलंदाजीविषयी तो म्हणाला, “मी गोलंदाजीविषयीही तेवढाच विश्वासू आहे. मी पावर प्लेमध्ये गोलंदाजी केली आहे. मधल्या षटकातही गोलंदाजी केली आहे, १६-१७ वे षटकही टाकले आहे. एवढेच नाही तर शेवटचे षटकही टाकले आहे. अशात संघाला जी गरज असेल, मी ते करण्याचा प्रयत्न करेल. यासाठीच मी तयारी करत आहे. मी वन डायमेंशनल खेळाडू बनू इच्छित नाही, जो फक्त एका भूमिकेवर फोकस करेल. मी लवचीक खेळाडू बनू इच्छितो, जो सर्वकाही करण्यासाठी तयार असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
ऍरॉन फिंचच्या घरी ‘नव्या पाहुणी’चे आगमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने गोड फोटो केला शेअर; नावही सांगितले
‘गोल्डन बॉय’चा भाव वाढला! ब्रँड व्हॅल्यूमध्ये नीरजने रोहित-राहुलला सोडले मागे, आता कोहलीवर नजर
विवाहित, पदरी २ लेकी, तरीही पहिल्याच नजरेत धवनचा आयेशावर जडला होता जीव; वाचा इनसाईड लव्हस्टोरी