गुरुवारी (२८ ऑक्टोबर) टी२० विश्वचषकातील २२ व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ एकमेकांसमोर होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क या सामन्यात पुन्हा त्याच्या चांगल्या फॉर्ममध्ये परतताना दिसला.
त्याने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करत त्याच्या चार षटकांमध्ये २७ धावा दिल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. सामन्यात त्याने एक असा उत्कृष्ट यार्कर चेंडू फेकला, ज्यावार श्रीलंकेच्या कुशल परेराला विकेट गमवावी लागली. आयसीसीने त्याने फेकलेल्या या चेंडूचा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केला आहे.
स्टार्कने हा चेंडू श्रीलंकेच्या डावाच्या ११ व्या षटकात टाकला होता. ज्यावेळी परेराने २४ चेंडूंचा सामना करून ३५ धावा केल्या होत्या. परेराने विकेट गमावण्याच्या आधीच्या चेंडूवर स्टार्कला एक जोरदार षटकार मारला होता. त्यानंतर स्टार्कने पुढच्याच चेंडूवर इनस्विंग यॉर्कर चेंडू फेकला, जो थेट मधल्या स्टंपवर जाऊन लागला. परेराने हा चेंडू आडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण चेंडू जास्त वेगाने असल्यामुळे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही.
https://www.instagram.com/reel/CVk5WMslwEE
दरम्यान, सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावले आणि १५४ धावा केल्या. यामध्ये कुशल परेराने ३५ धावा, चारिथ असलंकाने ३५ आणि भानुका राजपक्षेने नाबाद ३३ धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरात, ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य तीन विकेट्सच्या नुकसानावर आणि अवघ्या १७ षटकांमध्ये गाठले. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर डेविड वार्नरही या सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. त्याने ४२ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाची सलामी जोडी डेविड वॉर्नन आणि ऍरॉन फिंच यांनी संघाला चांगली सुरुवात दिली होती. त्यांनी पावरप्लेमध्ये संघाला ६३ धावा करून दिल्या. त्यांच्या या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने सामन्यात सहज विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –