---Advertisement---

‘हिटमॅन’चा विक्रम! रोहितने मॅन ऑफ द मॅच जिंकताच ‘या’ दिग्गजाच्या यादीत सामील

On: गुरूवार, नोव्हेंबर 4, 2021 2:32 AM
---Advertisement---

टी२० विश्वचषकाच्या ३३ व्या सामन्यात भारत आणि अफगाणिस्तान हे दोन संघ आमने सामने होते. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. भारताने या सामन्यात अफगाणिस्तानवर ६६ धावांनी विजय मिळवला. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुलने या सामन्यात भारतीय संघासाठी महत्वाची खेळी केली होती. रोहितला त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी सामनावीर पुरस्कारही देण्यात आला.

भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल या दोघांनी भारताच्या डावाची चांगली सुरुवात करून दिली. राहुलने ४८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६९ धावा केल्या. तसेच रोहितने ४७ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७४ धावा केल्या. या दोघांनी १४० धावांची सलामी भागीदारीही रचली.

रोहितला त्याच्या प्रदर्शानासाठी सामनावीर निवडले गेले असून ही ११ वी वेळ आहे, जेव्हा तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामनावीर ठरला आहे. तसेच रोहित या सामन्यात मिळालेल्या या पुरस्कारानंतर टी२० आंतरराष्टीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेल्या पहिल्या पाच खेळाडूंमध्येही सहभागी झाला आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर पुरस्कार मिळवलेले पाच खेळाडू
१. मोहम्मद नबी (अफगाणिस्तान) १३ वेळा सामनावीर पुरस्कार विजेता
२. विराट कोलही (भारत) १२ वेळा सामनावीर पुरस्कार विजेता
३. मोहम्मद हाफीज (पाकिस्तान) ११ वेळा सामनावीर पुरस्कार विजेता
४. शाहिद अफ्रिदी (पाकिस्तान) ११ वेळा सामनावीर पुरस्कार विजेता
५. रोहित शर्मा (भारत) ११ वेळा सामनावीर पुरस्कार विजेता

दरम्यान, सामन्यात अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय फलंदाजांनी तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन करून त्यांनी घेतलेला हा निर्णय चुकीचा ठरवला. भारताने प्रथम फलंदाजी करत मर्यादित २० षटकांमध्ये २ विकेट्सच्या नुकसानावर २१० धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघ २० षटकात ७ विकेट्सच्या नुकसानावर १४४ धावा करू शकला. परिणामी भारताने सामना जिंकला आणि टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील त्यांचे विजयाचे खाते उघडले.

भारतीय संघाला स्पर्धेतील त्यांचे आव्हान कायम ठेवण्यासाठी आणि अफगाणिस्तानला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे होते. पराभवानंतर आता अफगाणिस्तानच्या अडचणीत वाढ होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहित अन् राहुलचा अर्धशतकी धमाका! चौदा वर्षांपूर्वीच्या मोठ्या विक्रमाची केलीय बरोबरी

रोहित-राहुल जोडी नंबर एक! चौदा वर्षांपूर्वी सेहवाग-गंभीरचा विक्रम मोडत ‘या’ यादीत मिळवले अव्वल स्थान

रोहितचा झंझावात! अफगाणिस्तानविरुद्ध ७४ धावांच्या खेळीसह जयवर्धनेच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---