---Advertisement---

पाकिस्तान संघातील ३९ वर्षीय शोएब मलिक स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काय करतो? घ्या जाणून

On: मंगळवार, नोव्हेंबर 9, 2021 12:58 AM
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने संघात पुन्हा पुनरागमन केले आहे. मलिकचे वय सध्या ३९ वर्ष असून अजूनही तो त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. त्याने पाकिस्तान आणि स्कॉटलंड संघामध्ये रविवारी (७ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात जबरदस्त खेळी केली. या सामन्यात त्याने अवघ्या १८ चेंडूत ५४ धावा करून त्याचे वेगवान अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर पाकिस्तानने या सामन्यात ७२ धावांनी विजय मिळवला. सामन्यानंतर मलिकने सांगितले की, त्याची फिटनेसप्रती असलेली आवड त्याला इथपर्यंत घेऊन आली आहे. त्याने त्याच्या फिटनेसचे रहस्यही सांगितले आहे.

मलिक सामन्यानंतर म्हणाला की, “प्रामाणिकपणे सांगायचे, तर जेव्हा मी आरसा पाहतो, तेव्हा माझ्यामध्ये स्वत:ला फिट ठेवण्यासाठी एक आवड निर्माण होते आणि सर्वात महत्वाचे हे आहे की, मी आजही क्रिकेटचा आनंद घेत आहे. त्यामुळे मदत मिळत आहे. शेवटी संघालाही याचा फायदा होत आहे. मला असे वाटते की, जर तुम्हाला फिट राहण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला दररोज सराव करावा लागेल आणि मी हेच करत आहे. मी निश्चित सांगू शकत नाही की, मी एक वर्ष किंवा दोन वर्ष अजून खेळेल. आत्ता एक महत्वाची स्पर्धा चालू आहे आणि मी याविषयी विचार करत नाही.”

पाकिस्तानने टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत सर्वात आधी उपांत्य सामन्यात स्थान पक्के केले होते आणि गुरुवारी ऑस्ट्रेलियासोबत त्यांचा उपांत्य सामना असणार आहे.

याविषयी बोलताना मलिक म्हणाला, “निश्चितच आम्ही ऑस्ट्रेलियाला पाहिले आहे, ज्या प्रकारे ते खेळत आहेत. ते प्रत्यक्षात एक चांगल्या प्रकारचे क्रिकेट खेळत आहेत. आम्हीही चांगले खेळत आहोत, पण निश्चितच हे दोन्ही संघांसाठी एक कडवे आव्हान असेल.  आता उपांत्य सामन्याला काही दिवस बाकी आहेत, त्यामुळे आम्ही त्यासाठी रणनीत तयार करू.”

मलिक पाकिस्तानचा टी२० संघ निवडला गेला, त्यावेळी संघाचा भाग नव्हता, पण नंतर सोहेब मकसूदला दुखापत झाल्यामुळे त्याला संघात सामील केले गेले. याविषयी बोलताना तो म्हणाला की, “जेव्हा पहिला संघ घोषित करण्यात आला, तेव्हा मी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत होतो. संघात माझे नाव नव्हते. नक्कीच मला वाईट वाटले. मी खूप निराश होतो. मी असे अनेक संघ पाहिले आहे, ज्यामध्ये माझे नाव नव्हते, पण जेव्हा तुम्ही विश्वचषक संघाचा भाग नसता, तेव्हा वाईट वाटते.”

महत्त्वाच्या बातम्या – 

केवळ फलंदाजीतच नाही, तर क्षेत्ररक्षणातही चमकला हिटमॅन! ‘असा’ कारनामा करणारा पहिलाच भारतीय

हिटमॅन @३०००! आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा विराट कोहलीसारखाच मोठा पराक्रम

कॅचमास्टर! नामिबियाविरुद्ध ३ झेल घेत रोहितने ‘या’ यादीत विराट, रैनाला पछाडत पटकावला अव्वल क्रमांक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---