ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या पुरूषांच्या आठव्या टी20 विश्वचषकातील पहिला सुपर 12चा सामना शनिवारी (22 ऑक्टोबर) गट एक मधील गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्याची नाणेफेक यजमान संघ ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंच याने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले आहे.
न्यूझीलंडने ब्रेसवेल आणि मिल्ने यांना वगळले आहे. ऑस्ट्रेलियाने स्टिव्ह स्मिथ, ऍश्टन एगर, केन रिचर्डसन आणि कॅमेरून ग्रीन यांना बाकावर बसवले आहे. हे दोन्ही संघ मागील वर्षीच्या टी20 विश्वचषकात समोरा-समोर आले होते. त्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन याने अर्धशतकी खेळी केली होती. त्याच्याकडून पुन्हा एकदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध सराव सामना जरी गमावला असला तरी टिम डेविड आणि मिशेल स्टार्क हे चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. तसेच त्यांना घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदादेखील होऊ शकतो
न्यूझीलंडने 2021च्या टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 विकेट्सने गमावला. तसेच त्यांनी 2011पासून ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवले नाही. तसेच त्यांनी नुकत्याच घरच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध टी20 प्रकारची मालिका गमावली असून महत्वाचे गोलंदाजही जखमी असल्याने ते ऑस्ट्रेलियाचा कसा सामना करतील हे पाहण्याजोगे ठरणार आहे.
दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन-
ऑस्ट्रेलिया संघ: ऍरॉन फिंच (कर्णधार), डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेविड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ऍडम झम्पा, जोश हेझलवूड.
न्यूझीलंड संघ: डेवॉन कॉनवे (विकेटकीपर), फिन ऍलन, केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, इश सोधी
Batting first at the @scg! A toss win for Aaron Finch and Australia to start the @T20WorldCup. @glenndominic159 playing his 50th T20I for New Zealand today. Follow play LIVE in NZ with @skysportnz and @SENZ_Radio. #T20WorldCup pic.twitter.com/DdoRMnaAn3
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 22, 2022
ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड टी20 सामन्यांत आमने-सामने
सामने- 18
ऑस्ट्रेलिया विजयी- 10
न्यूझीलंड विजयी- 4
रद्द- 3
बरोबरी – 1
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅप्टन रोहितचे स्पष्टीकरण! सांगितले, टीम इंडिया 2021च्या टी20 विश्वचषकापासून कशी चेंज झाली
डेविड वॉर्नर लवकरच होणार निवृत्त! ‘या’ विश्वचषकापर्यंत खेळण्याचा असेल प्रयत्न