ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) सर्वच संघ सरावामध्ये व्यस्त आहेत. अशातच भारताचे फलंदाजही नेटमध्ये सराव करत आहे. काही संघांनी सराव सामने देखील खेळले आहे. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विरुद्ध दोन सामने नाही खेळला, मात्र त्याने त्याची नेटप्रॅक्टीस सुरू ठेवली आहे. अशातच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.
या व्हिडिओमध्ये विराट कोहली (Virat Kohli) हा फलंदाजाचा सराव कर आहे. अशावेळी मागून कोणीतरी विराटशी हिंदीमध्ये संवाद साधतानाचा आवाज येत आहे. तो व्यक्ती विराटला म्हणतो, “तुझा वेळ संपला आहे.” नेटमध्ये सराव करताना विराटचा वेळ संपला आहे, अशी जाणीव ती व्यक्ती त्याला करून देते. अशावेळी विराट लगेच उत्तर देतो. विराट त्याला म्हणतो, “हो, हो ठीक आहे… हुड्डा आला तर मी परत जाईल. त्याचीच वाट पाहत आहे.” त्याच्या या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तसेच नेटमध्ये सराव करण्यासाठी प्रत्येक खेळाडूला एक विशेष वेळ/ स्लॉट दिला जातो. त्यावेळेतच खेळाडू आपला सराव करतो.
दीपक हुड्डा (Deepak Hooda) हा भारताचा कमी वेळातच महत्वाचा फलंदाज ठरत आहे. त्याने यावर्षीच भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो टी20 विश्वचषकाच्या मुख्य संघात आहे. तसेच त्याने कारकिर्दीच्या तिसऱ्या डावातच आंतरराष्ट्रीय टी20मध्ये शतक झळकावले. हे शतक त्याने आयर्लंड विरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना केले होते आणि भारताच्या संघात तिसऱ्या क्रमांकावर सध्यातरी सर्वाधिकवेळा विराटच फलंदाजी करतो. त्याचबरोबर हुड्डा कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करतो.
https://twitter.com/Gampa_cricket/status/1580545103906869249?s=20&t=ZjH7itRr–8q0GRnDFB7Mw
टी20 विश्वचषकात भारत सुपर 12च्या ग्रुपमध्ये आहे. त्यामुळे भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंंडवर खेळला जाणार आहे. पाकिस्तान विरुद्ध भिडण्यापूर्वी भारत दोन सराव सामने खेळणार आहे. भारत 17 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि 19 ऑक्टोबरला न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. हे दोन्ही सामने ब्रिसबेन येथे खेळले जाणार आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: विश्वचषकापूर्वी पाकिस्तानची खतरनाक गोलंदाजी चर्चेत, न्यूझीलंड फलंदाजाच्या बॅटचे दोन तुकडे
पृथ्वी शॉने विराट कोहलीच्या अंदाजात केले शतकाचे सेलेब्रेशन! व्हिडिओ होतोयं व्हायरल
काय भानगड! हरभजन सिंगच्या एकाच आवाजावर हादरलं पंजाब क्रिकेट असोसिएशन, अध्यक्षाने दिला राजीनामा