भारत रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारत ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) उतरणार आहे. रोहितची आयसीसी स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ आहे. नुकतेच भारताने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचा टी20 मालिकांमध्ये पराभव केला आहे. त्यातच 2021च्या विश्वचषकानंतर ते आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये भारताची कामगिरी पाहिली तर रोहितच्या कर्णधारपदाखाली संघ वेगळाच दिसत आहे. त्याच्या या यशामागचे रहस्य भारताच्याच माजी विकेटकीपरने सांगितले आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत खेळलेल्या पार्थिव पटेल याने त्याच्या यशामागचे रहस्य उलगडले आहे. क्रिकबजशी बोलताना माजी विकेटकीपर पार्थिव पटेल म्हणाला, रोहित शर्मा हा एक असा खेळाडू आहे जो आऊट ऑफ फॉर्म असलेल्या खेळाडूंसोबत अधिक चर्चा करतो. 2016मध्ये मी फॉर्ममध्ये नव्हतो त्यावेळी त्याने माझ्याशी अधिक वेळ गप्पा मारल्या, मात्र 2015 आणि 2017मध्ये मी चांगला फॉर्ममध्ये होतो तेव्हा तो अधिक काही बोलला नाही. जेव्हा आपल्याला समजते की कर्णधारच आपले समर्थन करत आहे तेव्हा आपल्या कामगिरीवर अधिक दिसून परिणाम येतो.
टी20 विश्वचषकाआधी जसप्रीत बुमराह याने पुनरागमन केले होते आणि तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला. यावरून अधिक चर्चा सुरू आहेत. याबाबत बोलताना पार्थिव म्हणाला, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड हे योजना आखतात आणि ती बरोबर अमंलात आणतात. रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना त्यांनी अधिक संधी दिल्या. गोलंदाजीतही अनेक बदल पाहायला मिळाले. बुमराहला झालेली दुखापत हे दुर्भाग्य असून त्याबाबत आपण काही करूही शकत नाही. तसेच त्यांनी पॉवरप्लेमध्येही स्पिनर्सकडून गोलंदाजी करवून घेतली आहे.
भारताने रोहितच्या नेतृत्वाखाली 2021च्या टी20 विश्वचषकानंतर ते आतापर्यंत अनेक मालिका जिंकल्या आहेत, मग त्या घरच्या मैदानावर असो वा बाहेरच्या मैदानावर. मागील काही मालिकांपासून टी20 क्रिकेटमध्ये तर भारताचाच बोलबाला दिसत आहे. भारताने इंग्लंड, वेस्ट इंडिज यांना त्यांच्या घरात पराभूत केले आहे. टी2. विश्वचषकातही भारताची कामगिरी उत्तम व्हावी अशी अपेक्षा चाहते करत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऐन वर्ल्डकपच्या तोंडावर कोचचा राजीनामा, दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलूचा कारनामा!
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १८ – उपेक्षित गुणवंत..
T20 World Cup 2022: जसप्रीत बुमराहची रिप्लेसमेंट मिळाली! ‘तो’ खेळाडू होणार ऑस्ट्रेलियाला रवाणा