पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी मोठ्या काळानंतर आंतरराष्ट्रीय संघात पुनरागमन करत आहे. त्याला ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेत संघात सामील केले आहे. तो दुखापतीमुळे संघाच्या बाहेर होता, दुसरीकडे भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कोरोनातून बरा होत आणि फिटनेस टेस्ट पास करत संघात परतला आहे. या दोघांच्या भेटप्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
ब्रिसबेनच्या गाबा मैदानावर भारताने सोमवारी (17 ऑक्टोबर) ऑस्ट्रेलियाला 6 धावांनी पराभूत केले. त्याच मैदानावर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सराव सामना सुरू आहे.
पाकिस्तानच्या सराव सामन्यापूर्वी शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) याने नेटमध्ये सराव केला. त्याचवेळी शाहीन आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांची भेट झाली. शाहीन जेव्हा आला तेव्हा शमीने त्याला हाक मारली. शमी म्हणाला, “शाहीन भाई कसा आहेस?”, यानंतर शाहीनने त्याची गळाभेटही घेतली.
शाहीनेही शमीला त्याची विचारपूस केली. त्याने शमीला कोरोनाबाबत विचारताना म्हटले, “हे संपतच नाहीये”. त्यानंतर शमीने हसताना म्हटले, “नंबर दे यार.” या दोघांनी हा संवाद हिंदीमध्ये केला असून त्यांचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये शमी त्याला काही टिप्स देतानाही दिसतो.
The @T20WorldCup meetup: Stars catch up on the sidelines 🤩#WeHaveWeWill | #T20WorldCup pic.twitter.com/J1oKwCDII2
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 17, 2022
शमीला कोरोनामुळे घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी20 मालिकांना मुकावे लागले होते. टी20 विश्वचषकात त्याला जसप्रीत बुमराह याच्याजागी संघात घेतले आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात 20वे हे एकमेव षटक टाकताना 3 विकेट्स घेतल्या.
शमी 2021च्या टी20 विश्वचषकानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळणार आहे. तर शाहीनही आशिया चषक 2022ला मुकला होता. तसेच त्याने यावर्षी एकच आंतरराष्ट्रीय टी20 सामना खेळला आहे. त्याने इंग्लंड विरुद्धच्या सराव सामन्यात 2 षटके टाकताना 7 धावा दिल्या.
टी20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान सुपर 12च्या एकाच गटात आहे. त्यामुळे त्यांच्यात साखळी सामना खेळला जाणार असून तो 23 ऑक्टोबरला मेलबर्न येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्रर्र, आता कसं होणार! कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध भिडण्यापूर्वीच रिषभ पंत जखमी? फोटो व्हायरल
पीएमडीटीए सोलिंको ओम दळवी मेमोरीयल टेनिस स्पर्धेत ऋषभ, ओवी मारणे, रेयांश गुंड यांना विजेतेपद