---Advertisement---

टी20 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात नामिबियाचा कहर, श्रीलंकेला दिले 164 धावांचे टारगेट

On: रविवार, ऑक्टोबर 16, 2022 11:23 AM
T20 WC SLvNAM
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022चा पहिला सामना (16 ऑक्टोबर) आशिया चॅम्पियन श्रीलंका विरुद्ध नामिबिया यांच्यात खेळला गेला. हा सामना ऑस्ट्रेलियाच्या सायमंड्स स्टेडियम, जीलॉंग येथे खेळला जात आहे. त्यामध्ये श्रीलंकेने नाणेफेक जिंकत नामिबियाला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. यावेळी श्रीलंकेच्या गोलंदाजांनी त्यांचा उत्तम फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न केला, मात्र नामिबियाच्या फलंदाजांनी मागील टी20 विश्वचषकात झालेली चूक पुन्हा केली नाही. त्यांनी 20 षटकात 7 विकेट्स गमावत 163 धावासंख्या उभारली.

श्रीलंकेने याचवर्षी आशिया चषक जिंकला. त्यामध्ये त्यांनी सर्व विभागात चांगली कामगिरी केली. त्याच कामगिरीत सातत्या राखत त्यांनी टी20 विश्वचषकाचीही सुरूवात चांगली केली. नामिबियाचे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले. मायकल वॅन लिंगेन (3) याला दुष्मांता चमीराने आणि दिवॅन ला कॉक (9) प्रमोद मधुशान यांनी बाद केले. त्यानंतर लोफ्टी ईटॉन (20) आणि स्टिफन बार्ड (26) यांनी नामिबियाचा धावफलक हलता ठेवला. बार्डने एमजी इरॅमस याच्यासोबत चौथ्या विकेटसाठी 41 धावांची भागादारी केली. तरीही या सामन्यात नामिबियाने 15 षटकात 6 विकेट्स गमावत 95 धावसंख्या उभारली.

https://twitter.com/ICC/status/1581513872107884547?s=20&t=5YVzhfpdc3ZGE7QMK6pXGA

नामिबियाचे वरच्या फळीतील फलंदाज बाद झाले असले तरीही खालच्या फळीतील खेळाडूंनी चांगली फलंदाजी केली. त्यातील सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जॅन फ्रिलिंक याने 28 चेंडूत 44 धावा केल्या. त्याने जेजे स्मीट याच्यासोबत सातव्या विकेटसाठी 33 चेंडूत 69 धावांची भागीदारी रचली. ज्यामुळे त्यांनी 150चा आकडा पार केला.

या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सुरूवात चांगली केली, मात्र नंतर त्यांना नामिबियाच्या फलंदाजांनी चांगलेच धुतले. अशातच महीश तीक्क्षणा आणि वानिंदू हसरंगा यांची गोलंदाजी प्रभावशाली ठरली. तीक्क्षणाने 4 षटकात 23 धावा देत एक विकेट आणि हसरंगाने 4 षटकात 27 धावा देत 1 विकेट घेतली. त्यांच्याशिवाय चमीरा, मधुशान आणि करुणारत्ने यांचा इकॉनॉमी रेट 9च्यावर राहिला. मधुशानने 4 षटकात 37 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

https://twitter.com/OfficialSLC/status/1581521399818375168?s=20&t=5YVzhfpdc3ZGE7QMK6pXGA

नामिबियाच्या फलंदाजांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचे वाभाडे काढल्याने त्यांच्या फलंदाजांना चांगली सुरूवात करून द्यावी लागणार आहे. अशातच त्यांचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका दुखापतग्रस्त असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नामिबिया आणि श्रीलंका 2021च्या विश्वचषकात समोरासमोर आले होते. तेव्हा नामिबिया 96 धावांवर सर्वबाद झाला होता. तो सामना श्रीलंकेने 7 विकेट्सने जिंकला होता.

टी20 विश्वचषक 2014चे चॅम्पियन श्रीलंका यावर्षी ग्रुप स्टेज पार केल्यावर सुपर 12मध्ये जाणार आहे. त्यामध्ये त्यांना नामिबिया बरोबरच युएई आणि नेदरलॅंड्स या संघाविरुद्ध खेळायचे आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंकेला मोठा झटका, आशिया चषक गाजवलेला ‘हा’ स्टार वेगवान गोलंदाज टी20 विश्वचषकातून बाहेर
द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यामागे ‘लॉर्ड’ शार्दुल कनेक्शन?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---