टी20 विश्वचषकाच्या (T20 World Cup) दुसऱ्या दिवशी पहिल्या फेरीमध्ये ब गटाचे संघ समोरासमोर आले आहेत. ब गटाचा पहिला सामना वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड यांच्यात सोमवारी (17 ऑक्टोबर) होबार्ट येथे खेळला गेला. या सामन्यात स्कॉटलंडने वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का दिला आहे. स्कॉटलंडने हा सामना 42 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या सुपर 12मधील प्रवेशाच्या अडचणीत वाढ झाली आहे. फलंदाज जॉर्ज मुन्से आणि गोलंदाज मार्क वॅट आणि मायकल लीस्क यांनी या विजयात महत्वाची भुमिका निभावली.
या सामन्यात स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट्स गमावत 160 धावा केल्या. यावेळी त्यांचा सलामीवीर जॉर्ड मुन्से याने 55 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या, तर कॅलम मॅकलॉड याने 23 धावा केल्या. वेस्ट इंडिजसाठी अल्जारी जोसेफ आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची बरी सुरूवात झाली, मात्र काही क्षणातच एकामागोमाग विकेट्स पडत राहिल्या. वेस्ट इंडिजचे सलामीवीर कायले मेयर्स आणि एविन लेवीस हे अनुक्रमे 20 आणि 14 धावा करत तंबूत परतले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला ब्रेंडन किंग देखील काही करू शकला नाही. त्याने 15 चेंडूत 3 चौकार मारत 17 धावा करत विकेट गमावून बसला. यामुळे संघ 18.3 षटकातच 118 धावापर्यंत मजल मारू शकला. वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा होल्डरने केल्या. त्याने 38 धावा तर मेयर्सने 20 धावा केल्या. कर्णधार निकोलस पूरन तर पूर्णपणे अपयशी ठरला.
What a performance 🔥
Scotland get their campaign underway with a commanding victory against West Indies 💪#T20WorldCup | #WIvSCO | 📝 https://t.co/zYWEnEHtif pic.twitter.com/rWZPmS9wyR
— T20 World Cup (@T20WorldCup) October 17, 2022
वेस्ट इंडिजने 2012 आणि 2016मध्ये टी20 विश्वचषक जिंकला आहे. तसेच त्यांंची मागील टी20 विश्वचषकातही निराशाजनक कामगिरी झाली होती.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या या टी20 विश्वचषकाच्या पहिल्या दिवशी श्रीलंकेला नामिबियाने पराभवाचा धक्का दिला. आता स्कॉटलंडने वेस्ट इंडिजला पराभवाची धूळ चारली आहे. यामुळे पुढील काही दिवसांतच असे बदल पहायला मिळण्याची शक्यता आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटने टिपला अविश्वसनीय झेल! क्षणार्धात पालटला सामना; पाहा थक्क करणारा व्हिडिओ
INDvAUS: मोहम्मद शमीच्या ‘त्या’ एका ओव्हरने पालटले सामन्याचे चित्र, व्हिडिओ पाहाच