आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 13वा सामना आज (7 मे) रोजी कॅनडा (Canada) विरुद्ध आयर्लंड (Ireland) यांचा सामना रगला आहे. न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. यंदाच्या टी20 विश्वचषकात कॅनडा (Canada) आणि आयर्लंड (Ireland) हे दोन्ही संघ ग्रुप-अ मध्ये समाविष्ट आहेत. दोन्हीही संघ ग्रुप-अ मध्ये गुणतालिकेत 4 आणि 5व्या स्थनावर आहेत.
तत्पूर्वी या सामन्यात आयर्लंडनं टाॅस जिंकून कॅनडाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. त्याबदल्यात कॅनडानं 138 धावांच आव्हान आयर्लंडपुढे ठेवलं आहे. कॅनडाकडून निकोलस किर्टननं 35 चेंडूत सर्वाधिक 49 धावा ठोकल्या. यादरम्यान त्यानं 3 चौकारांसह 2 षटकार लगावले. तर यष्टीरक्षक श्रेयस मोव्वानं 36 चेंडूत 37 धावांचं योगदान दिलं. आयर्लंडसाठी गोलंदाजी करताना क्रेग यंग आणि बॅरी मॅककार्थी 2-2 विकेट्स घेत संघाला मोलाचं योगदान दिलं.
दोन्ही संघ यंदाच्या टी20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यात पराभूत झाले आहेत. कॅनडा संघाचा यजमान अमेरिकेनं पहिल्याच सामन्यात धुव्वा उडवला. तर आयर्लंड संघाला भारताकडून पराभव पत्करावा लागला. भारत विरुद्ध आयर्लंड सामना नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला होता. त्यामुळे आयर्लंड संघाला या मैदानाचा अनुभव आला असेल. आता या खेळपट्टीवर आयर्लंड संघ दिलेल्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे पाठलाग करेल हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरेल.
नासाउच्या मैदानावर श्रीलका (Sri Lanka) आणि दक्षिण अफ्रीका (South Africa) समन्यात 77 धावसंख्या झाली होती. तर भारत (India) विरुद्ध आयर्लंड (Ireland) सामनादेखील याच मैदानावर खेळला गेला होता. त्यावेळी आयर्लंडनं सर्वबाद 96 धावा केल्या होत्या. या मैदानावर प्रथमच कॅनडानं 100 धावांचा आकडा पार केला.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
कॅनडा- आरोन जॉन्सन, नवनीत धालीवाल, परगट सिंग, निकोलस किर्टन, श्रेयस मोव्वा (यष्टीरक्षक), दिलप्रीत बाजवा, साद बिन जफर (कर्णधार), डिलन हेलिगर, कलीम सना, जुनैद सिद्दीकी, जेरेमी गॉर्डन
आयर्लंड- अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), लॉर्कन टकर (यष्टीरक्षक), हॅरी टेक्टर, कर्टिस कॅम्फर, जॉर्ज डॉकरेल, गॅरेथ डेलेनी, मार्क एडेअर, बॅरी मॅककार्थी, जोशुआ लिटल, क्रेग यंग
महत्त्वाच्या बातम्या-
आयर्लंडनं जिंकला टाॅस; प्रथम गोलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत-पाकिस्तान सामना, सुरक्षा यंत्रणाबाबत पोलिस आयुक्तांनी दिली मोठी अपडेट!
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी, भारतीय खेळाडूंची युवराज सिंग सोबत डिनर पार्टी! फोटो व्हायरल