यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 25वा सामना आज (12 जून) रोजी भारत विरुद्ध अमेरिका यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. न्यूयाॅर्कच्या नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी यंदाच्या टी20 विश्वचषकतील 2 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. भारतानं टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
अमेरिका- स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिस गॉस (यष्टीरक्षक), आरोन जोन्स (कर्णधार), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रावळकर, अली खान
यजमान अमेरिका संघानं पहिल्या सामन्यात कॅनडाचा धुव्वा उडवून टी20 विश्वचषकाची सुरुवात एका धमाकेदार विजयानं केली. तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी 2009च्या टी20 विश्वचषक चॅम्पियन पाकिस्तान संघावर थरारक विजय मिळवत विजयाची मोहिम सुरुच ठेवली आहे. परंतु आजच्या सामन्यात त्यांना भारतीय संघाचं मोठं आव्हान असणार आहे.
भारतानं देखील यंदाच्या टी20 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. भारतानं टी20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात आयर्लंड संघाला पराभूत केलं, तर दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला 6 धावांनी धूळ चारत विजयाला गवसणी घातली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं पाकिस्ताच्या फलंदाजांवर गोलंदाचीचा आक्रमक मारा करत भारताला सामना जिंकवून दिला.
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही संघ कधीही भिडले नाहीत. नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि अमेरिका हे संघ प्रथमच भिडणार आहेत. दोन्ही संघांनी यंदाच्या टी20 विश्वचषकात उत्कृष्ट प्रदर्शन केलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये आज अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-अमेरिका सामन्यापूर्वी, भारताच्या दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाला सल्ला
रिषभ पंत भारताचा दुसरा युवराज सिंग? कपिल देव यांनी दिली खळबळजनक प्रतिक्रिया!
कॅनडा विरुद्धच्या सामन्यात हारिस रौफ चमकला, रचला इतिहास!