आगामी टी20 विश्वचषकाची (t20 world cup) सुरुवात येत्या 2 जूनपासून होणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघ टी20 विश्वचषकासाठी 3 दिवसांपूर्वी अमेरिकेला रवाना झाला होता. त्यामध्ये भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) संघासोबत सहभागी नव्हता. परंतु हार्दिक पांड्यानं सोशल मीडियावर माहिती दिली आहे की, तो आता भारतीय संघासोबत सहभागी झाला आहे. हार्दिक पांड्या पहिल्या भारतीय संघाच्या तुकडीसोबत अमेरिकेला रवाना झाला नव्हता.
त्यानं बीसीसीआयला अमेरिकेला जाण्यासाठी थोडा वेळ मागितला होता. परंतु हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) बुधवारी (29 मे) रोजी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये तो एका मैदानावर दिसत आहे. हार्दिकनं त्याच्या पोस्ट खाली लिहलं की, “On national Duty IN”
View this post on Instagram
परंतु भारतीय संघासोबत अद्दाप दोन खेळाडू नाहीत. भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि भारतीय संघाचा युवा खेळाडू रिंकू सिंह (Rinku Singh) हे दोघे अजून भारतीय संघासोबत नाहीत. विराट कोहलीनं बीसीसीआयकडे भारतीय संघासोबत नंतर सहभागी होण्यासाठी थोडा वेळ मागितला होता. रिंकू सिंह आयपीएलच्या फायनलमुळे भारतीय संघासोबत अमेरिकेला रवाना झाला नाही.
विराट कोहली आणि रिंकू सिंह एक दोन दिवसात टी20 विश्वचषकासाठी अमेरिकेला रवाना होऊ शकतात. भारत त्यांचा टी20 विश्वचषकातील पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध खेळणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघ 1 जूलला बांग्लादेश संघासोबत सराव सामना खेळणार आहे. त्यापूर्वी विराट कोहली आणि रिंकू सिंह भारतीय संघात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ (15 सदस्य): रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.
राखीव खेळाडू: शुबमन गिल, रिंकू सिंह, आवेश खान आणि खलील अहमद.
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकात ‘हे’ 5 युवा खेळाडू घालतील धुमाकुळ
टी20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर परतला फाॅर्ममध्ये केवळ 20 चेंडूत झळकावले अर्धशतक
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल