आयपीएलच्या हंगामानंतर आता आगामी टी20 विश्वचषकाची (t20 world cup) सुरुवात 2 जूनपासून होत आहे. या टी20 विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जूनला खेळला जाणार आहे. टी20 विश्वचषकात एकूण 55 सामने खेळले जाणार आहेत. त्यापैकी सेमीफायनल 1, सेमीफायनल 2 आणि फायनल सामना खेळला जाईल.
आयसीसी (ICC) टी20 विश्वचषकाचा हा सातवा हंगाम आहे. टी20 विश्वचषकाची सुरुवात 2007 ला झाली. त्यावेळी भारतीय संघाने दक्षिण अफ्रीकेचा धुव्वा उडवत पहिला टी20 विश्वचषक जिंकला होता. टी20 विश्वचषकामध्ये युवा खेळाडू नेहमीच चाहत्यांचे तसेच वरिष्ठ खेळाडूंचे लक्ष वेधून घेतात. या टी20 विश्वचषकात सुद्धा काही युवा खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असेल. या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया कोणते युवा खेळाडू टी20 विश्वचषकात मुसंडी मारतील.
यशस्वी जयस्वाल: यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज आहे. त्यानं त्याच्या फलंदाजीमार्फत सर्व महान खेळाडूंचे लक्ष वेधून घेतले. तत्पूर्वी यशस्वी जयस्वाल हा पहिल्यांदाच टी20 विश्वचषक खेळणार आहे. तो भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सोबत सलामीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जयस्वालनं त्याच्या धडाकेबाज फलंदाजीनं सर्व भारतीयांची मन जिंकली आहेत. यावेळीसुद्धा या युवा खेळाडूवर भारतीयांची नजर असेल. त्यानं आंतरराष्ट्रीय 17 टी20 सामन्यांमध्ये 162 च्या स्ट्राईर रेटने आक्रमक फलंदाजी करत 502 धावा ठोकल्या आहेत.
ट्रिस्टन स्टब्स: ट्रिस्टन स्टब्स (Tristan Stubbs) हा दक्षिण अफ्रीकेचा युवा खेळाडू आहे. आयपीएल 2024 च्या हंगामात तो दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा भाग होता. त्यानं या हंगामात 190.91 स्ट्रईक रेटनं फलंदाजी करत 378 धावा कुटल्या आहेत. ट्रिस्टन स्टब्स हा आक्रमक शैलीचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याच्याकडे आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्यामुळे या खेळाडूवरती देखील नजर असणार आहे.
दिपेंद्र सिंह ऐरी (नेपाळ): नेपाळच्या या युवा खेळाडूचं नाव तेव्हा चर्चेत आलं जेव्हा त्यानं टी20 सामन्यात एका षटकात उत्तुंग सहा षटकार लगावले होते. एशियन गेम्समध्ये या फलंदाजानं केवळ 9 चेंडूत अर्धशतक झळकावलं होत. त्यानं भारताचा दिग्गज खेळाडू युवराज सिंगनं मारलेल्या वेगवान अर्धशतकाचं रेकाॅर्ड मोडीत काढलं. त्यामुळे या खेळाडूवरदेखील नजर असेल. दिपेंद्र सिंह ऐरीनं (Dipendra Singh Airee) 64 टी20 सामन्यात 1626 धावा ठोकल्या आहेत.
विल जॅक्स: विल जॅक्स (Will Jacks) हा इग्लंड संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. आक्रमक अंदाजात फलंदाजी करणाऱ्या या खेळाडूनं आयपीएलमध्ये वेगवान शतक झळकावलं. आयपीएल 2024 च्या हंगामात तो राॅयल चॅलेंजर्स संघाचा भाग होता. जॅक्सनं गुजरात टायटन्स विरुद्ध तुफानी फलंदाजी केली होती. त्यानं त्या सामन्यात 50 धावांपासून 100 धावा गाठण्यासाठी मात्र 10 चेंडू घेतले. त्याची ही आक्रमक शैली टी20 विश्वचषकात विरोधी संघांसाठी घातक ठरु शकते.
शमर जोसेफ: शमर जोसेफ (Shamar Joseph) हा वेस्ट इंडिजचा युवा खेळाडू आहे. वेस्ट इंडिजसाठी हा खेळाडू वेगवान गोलंदाजीमार्फत टी20 विश्वचषकात धार दाखवू शकतो. त्यानं 3 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याच्याकडे खूप वेगवान चेंडू टाकण्याची क्षमता आहे. शमर जोसेफ हा अशा गोलंदाजांपैकी एक आहे जो त्याच्या गोलंदाजीमार्फत धुमाकुळ घालू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर परतला फाॅर्ममध्ये केवळ 20 चेंडूत झळकावले अर्धशतक
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल