---Advertisement---

“बाबरनं संघाचं वातावरण बिघडवलं…” शाहीद आफ्रिदी भडकला दिलं तिखट उत्तर

On: रविवार, जून 9, 2024 4:45 PM
Pakistan
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 19वा सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. हा सामना न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात दोन्ही संघामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

एका टीव्ही शो दरम्यान शाहीद आफ्रिदीला (Shahid Afridi) एक प्रश्न विचारण्यात आला की, पाकिस्तानच्या संघामध्ये एकतेची कमी आहे. त्यावर त्यानं तिखट उत्तर दिलं तो म्हणाला, होऊ शकतं यापाठीमागे कर्णधार बाबर आझम (Babar Azam) असू शकतो. त्यानंतर शाहीद आफ्रीदी म्हणाला टी20 विश्वचषक झाल्यानंतर यावरती आपण खूप चर्चा करुया.

यंदाच्या टी20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) खूप बदल केले आहेत. त्यांनी त्यांच्या चेअरमनसहित संघाचा कर्णधारदेखील बदलला. बाबर आझमकडून कर्णधारपद काढून घेतलं आणि शाहिन आफ्रिदीकडे (Shahin Afridi) सोपवण्यात आलं होतं. परंतु टी20 विश्वचषकाआधी पाकिस्तान संघाची धुरा पुन्हा बाबर आझमकडे सोपवण्यात आली.

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी (Shahid Afridi) समा टीव्हीशी बोलताना म्हणाला, “हे पाहा बऱ्याच गोष्टी असतात, आता इथं मोहम्मद वसीम आहे ज्यानं निवड समितीमध्ये जोरदार भूमिका निभावली आहे. त्याला पण बऱ्याच गोष्टी माहित आहेत. मला सुद्धा बऱ्याच गोष्टी माहित आहेत. परंतु त्या मोकळेपणानं बोलल्या जाऊ शकत नाहीत.”

पुढे बोलताना शाहीद आफ्रिेदी म्हणाला, “सांगायच एवढच आहे की, जबाबदारी. मीसुद्धा पाकिस्तानचा कर्णधार राहिलो आहे. कर्णधार तो असतो जो तुमच्या संघाचा लीडर असतो. तो सर्व सांभाळत असतो. कर्णधार संघाला घडवत असतो, नाहीतर तो सर्व संघाचं वातावरण खराब करुन टाकतो. मग त्यानंतर प्रशिक्षक हे नंतर येतात. परंतु महत्त्वाचा कर्णधार आहे, जो संघात एकी निर्माण करण्याचं काम करतो. ”

शेवटच्या क्षणाला शाहीद आफ्रिदी म्हणाला, “शाहीन आफ्रिदी सोबत माझ एक अस नात आहे की, काही बोललो तर लोक म्हणतील की, तो स्वत:च्या जावयाची स्तुती करत आहे. परंतु मी तसा नाही. माझ्यासाठी जे वाईट ते वाईट आहे. आमच्या बोर्डानं मागच्या काही दिवसात खूप चूका केल्या आहेत. यंदाचा विश्वचषक संपला की, मी या गोष्टींवर मोकळेपणानं बोलेल. आम्ही या एकतेचं नुकसान केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“विराट कोहली जर लाहोरमध्ये खेळायला आला तर…” पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचं खळबळजनक वक्तव्य
आंद्रे रसेलचे निवृत्तीचे संकेत, टी20 विश्वचषकानंतर करणार क्रिकेटला रामराम? म्हणाला, “ट्रॉफी जिंकल्यानंतर…”
टी20 विश्वचषकादरम्यान पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तारखा जाहीर, 20 दिवस चालणार स्पर्धा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---