यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup 2024) भारतीय संघानं (5 जून) रोजी त्यांचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळला. न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना रंगला होता. त्यामध्ये भारतानं 8 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला. नासाउच्या या मैदानावर गोलंदाजांना खूप मदत मिळताना दिसत होती. तर फलंदाजांसाठी अडचणी निर्माण होत होत्या. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी रिकी पाँटिंगनं भारतीय संघाबद्दल वक्तव्य केलं आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंग (Ricky Ponting) म्हणाला, “भारतीय संघ मजबूत आहे. परंतु त्यांनी 2013 नंतर आयसीसी ट्राॅफी जिंकली नाही. भारतीय संघाला आयसीसी ट्राॅफीचा दुष्काळ संपवायचा असेल तर त्यांना इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करुन यंदाच्या टी20 विश्वचषकात उत्तम कामगिरी करावी लागेल.”
पुढे बोलताना रिकी पाँटिंग म्हणाला, “सर्व काही विस्फोटक फटकेबाजी करणं नसतं. स्ट्राईक रेटदेखील महत्त्वाची भूमिका बजावत असतं. भारतीय खेळाडूंचं स्ट्राईक रेट कोणापेक्षा कमी नाही. टी20 विश्वचषकातील प्रत्येक संघात कोणीतरी आक्रमक फलंदाज आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये स्टाॅइनिस, मॅक्सवेल, कॅमरन ग्रीनसारखे खेळाडू आहेत. तर दक्षिण आफ्रीकाकडे क्लासेन, स्टब्स, मिलर हे खेळाडू आहेत. परंतु भारतीय संघाकडे पाहिलं तर सुर्यकुमार यादव कोणत्याही मैदानावर धावा करण्याची तयारी ठेवतो. त्यामुळे हे खेळाडू त्यांच्या संघाची ताकद आहेत.”
पुढे बोलताना पाँटिंग म्हणाला, “रिषभ पंत चांगली कामगिरी करत आहे. भारताकडे हार्दिक पांड्यासुद्धा आहे. त्यामुळे भारतीय संघाचा फलंदाजी क्रम खूप घातक आहे. मला वाटत आहे की, ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, दक्षिण अफ्रीका हे चार संघ यंदाच्या टी20 विश्वचषकात सेमीफायनल सामने खेळतील. दक्षिण अफ्रीका हा सर्वात मजबूत संघ दिसत आहे. या चार संघांपैकी कोणीही विश्वचषक जिंकला नाही तर मला आश्चर्य वाटेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार का दुसऱ्या मैदानावर? जाणून घ्या एका क्लिकवर
ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकवणारा पॅट कमिन्स, टी20 विश्वचषकात मात्र दिसतोय ‘या’ भूमिकेत!
2023च्या विश्वचषकाबद्दल कर्णधार रोहित शर्मानंं केला मोठा खुलासा!